GB Syndrome: महाराष्ट्राची चिंता वाढली, GBS मुळे 5 जणांचा मृत्यू, पुण्यात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 149 रुग्ण असून पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GB Syndrome) मुळे झालेल्या संशयित मृत्यूंची संख्या आतापर्यंत (1 फेब्रुवारी) पाच झाली आहे. आतापर्यंत राज्यात या दुर्मिळ आजाराचे एकूण 149 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 124 रुग्णांची पुष्टी झाली आहे.
पुण्यात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, शनिवारी पुण्यातील वारजे भागात एका 60 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, रुग्णाचा मृत्यू श्वसनक्रिया बंद (Respiratory Failure) पडल्याने झाला. यापूर्वी राज्यात आणखी 4 संशयास्पद मृत्यूची नोंद झाली होती.
हे ही वाचा>> Prayagraj Stampede: कुंभमेळ्यात दुसरीकडेही झालेली चेंगराचेंगरी, सत्य कोणी लपवलं?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 149 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 124 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. पुण्यात या आजाराची लागण झालेले 29 रुग्ण आहेत तर 17 रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील, 13 रुग्ण पुणे ग्रामीण भागातील, 8 रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.
पाण्याच्या नमुन्यांची तपासणी उघडकीस आली
पुणे आणि आसपासच्या भागात जीबीएसचे बहुतेक रुग्ण आढळले आहेत. हे लक्षात घेऊन, पाण्याचे रासायनिक आणि जैविक विश्लेषण करण्यासाठी 160 नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत (Public Health Laboratory) पाठवण्यात आले. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, यापैकी 8 जलस्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत.










