Deepak Kesarkar :’…तर तुम्हाला अपात्र करेन’, मंत्री केसरकर भावी शिक्षिकेवर का भडकले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

deepak kesarkar education minister agree women teacher on teacher recruitment beed incident video
deepak kesarkar education minister agree women teacher on teacher recruitment beed incident video
social share
google news

Deepak kesarkar Agree Women Teacher : शिक्षक भरतीवरून (Teacher Recruitement) एका भावी महिला शिक्षक आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादात ”तुम्ही बेशिस्त वर्तन करताय, तुम्हाला अपात्र करेन”अशा आशयाची धमकी मंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी भावी महिला शिक्षकाला दिली आहे. महिलेने शिक्षक भरतीवरून केसरकरांना सवाल केला होता, त्यानंतर शिक्षणमंत्री चांगलेच संतापले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (deepak kesarkar education minister agree women teacher on teacher recruitment beed incident video)

शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी केसरकर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ही घटना घडली आहे. शिक्षक भरतीची वाट बघून आम्ही थकलो आहे सर, अशी व्यथा मांडताना ही भावी शिक्षक सुरूवातीला दिसते आहे. भावी शिक्षकाच्या या प्रश्नाने केसरकर संतापले. तुम्हाला अजिबात कळत नाही, शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे, असे केसरकर यांनी भावी शिक्षिकेच्या प्रश्नाला उत्तर दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nashik Accident : नाशिकच्या 5 भाविकांवर काळाचा घाला, कार-कटेंनरच्या भीषण अपघताात मृत्यू

भावी शिक्षिका पुढे म्हणते, साईट ओपन् आहे, रजिस्ट्रेशनही झाले, पण प्रोसिजर पुढे चालतच नाही. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेले पाहिजे तुमचा चॉईस दिला पाहिजे असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच भावी शिक्षिकेने जाहिरातच आली नसल्याचा दावा केला होता. या दाव्यावर केसरकर म्हणाले, जाहिरात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितली आहे.

पुढे भावी शिक्षिकने पण सर कधीपर्यत येणार? यावर केसरकर प्रचंड भडकले. मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्ही सरकारी नोकरीत येऊ शकत नाही. तुम्ही कशा मुलांना शिकवणार आहात? असा सवालच केसरकर यांनी शिक्षेकेला केला.

ADVERTISEMENT

साईट ओपन झाली आहे, रजिस्ट्रेशन झाले आहे. पण त्याच्या पुढच्या प्रोसिजरसाठी किती वाट पाहायची? असा सवाल शिक्षिकेने केला. साईट ओपन झाली आहे, भरती सुरु आहे, मग तुम्ही कशा आला मला विचारायला. आजपर्यंत पाच वर्षात कुणी भरती केली? मी केली ना. माझी महत्वाची मुलाखत सुरू आहे, त्यात तुम्ही येता, माझ्या मुलाखतीनंतर तुम्ही भेटला असता, अशी तंबी केसरकरांनी शिक्षिकेला दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Hardik Pandya IPL 2024 : हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सने सोडला 17.50 कोटींचा खेळाडू, कारण…

माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थ्याची महत्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता आहे, तर 30 हजार नोकऱ्या मी उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्या जर तुम्ही मुलांनाही बेशिस्त शिकवणार असाल तर ते मला अजिबात मान्य नाही आहे. हे स्पष्ट मी तुमच्या तोंडावर सांगतो, अशा शब्दात केसरकरांनी शिक्षिकेला सुनावले.

मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत, माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काही नाही, हे मला अजिबात मान्य नाही. तसेच अजिबात मध्ये बोलायचं नाही तर तुमचे नाव घेऊन मी तुम्हाला अपात्र करेन, अशी धमकी दिली केसरकरांनी शिक्षिकेला दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT