Joe Biden: कोण आहे ती चिमुकली, जिने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे केले स्वागत
G20 Summit 2023 : जी 20 परिषदेसाठी जो बायडेन भारतात आले. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलताना आणि स्वागत करताना एक चिमुकली दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT

G20 Summit 2023 : जी 20 च्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) भारत भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांचे दिल्लीविमान तळावर स्वागत करण्यात आले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी एका लहान मुलीचा त्यामध्ये समावेश होता. त्यामुळे बायडेन यांचे स्वागत करणाऱ्या त्या मुलींच्या फोटोनी आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फोटो झाले व्हायरल
बायडेन यांच्यासोबत ज्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या मुलीचे नाव माया आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची ती मुलगी आहे. विमानतळावर बायडेन यांचे स्वागत होताच मायाने त्यांचे स्वागत केले आहे.
हे ही वाचा >> G20 Summit 2023: जो बायडेन यांचं विमानतळावर कोणी केलं स्वागत?, उलटसुलट चर्चांना उधाण
मायाच्या हाता बायबल
माया ही काही आजच प्रसिद्धीला आली आहे असं नाही तर गार्सेटी यांची मुलगी गार्सेटी यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळीही मायाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत माया हिब्रू बायबल हातात धरुन उभा होती. गार्सेटी यांनी शपथ घेताना या बायबलवरच शपथ घेतली होती.