Akshay Gawate : महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण! कुटुंबाला खरंच 1 कोटी 13 मिळणार?
agniveer akshay gawate death : बुलढाणा जिल्ह्यातील अग्रिवीर अक्षय गवते यांना सिचाचीनमध्ये वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना लष्कराकडून १ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मदत केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

Agniveer Akshay Laxman Gawate Death Reason : जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. देशाचे रक्षक करत असताना शहीद झालेले अक्षय लक्ष्मण गवते हे पहिले अग्निवीर आहेत. जवान अक्षय गवते हे बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत. त्यांच्या निधनानंतर अग्निवीरांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा आणि आर्थिक मदतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांनी अग्निवीर योजनेवरून टीका केली आहे. दरम्यान, शहीद अग्रिवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला किती मदत मिळणार हेच जाणून घेऊयात…
लष्कराच्या लेहस्थित फायर अँड फ्युरी कॉर्प्सने रविवारी सांगितले की, सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते शहीद झाले. शहीद अक्षय गवते यांच्या निधनाबद्दल लष्कराने शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम कशी मिळणार हे सांगितले आहे.
अक्षय गवते सियाचीनमध्ये होते तैनात
गवते हे काराकोरम पर्वतरांगातील 20,000 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तैनात होते. या ग्लेशियरला जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. इथे सैनिकांना जोरदार बर्फाळ वाऱ्याचा सामना करावा लागतो. हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्लेशियर आहे.
हे ही वाचा >> Parag Desai Dies: धक्कदायक! Wagh Bakri चहा मालकाचा मृत्यू, भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव
शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला नक्की किती पैसे मिळणार?
शहिदांच्या कुटुंबीयांना द्यावयाच्या भरपाईबाबत लष्कराने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. ‘अग्नवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली. या दु:खद प्रसंगामध्ये भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबाबत सोशल मीडियावरील विरोधाभासी संदेश लक्षात घेता, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की नातेवाईकांना मिळणारे रक्कम सैनिकाच्या संबंधित अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जाते.’