Ulhasnagar crime : पती-पत्नीची आत्महत्या, आमदार किणीकरांना का करावा लागला खुलासा?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

husband and wife committed suicide in ulhasnagar
husband and wife committed suicide in ulhasnagar
social share
google news

Ulhasnagar crime news : माजी आमदार ज्योती कलानी यांचे माजी स्वीय सहाय्यक असलेल्या नंदकुमार ननावरे यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली. नंदकुमार ननावरे यांनी बंगल्याच्या गच्चीवरून पत्नीसह उडी घेऊन जीवन संपवलं. या घटनेनंतर मात्र, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना एक खुलासा करावा लागला. (husband wife committed suicide in ulhasnagar)

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (1 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा >> NCP : शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार ननावरे हे आपल्या परिवारासह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते. मंगळवारी (1 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास त्यांनी आपली पत्नी उर्मिला हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेनंतर आशेळेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. ननावरे दांपत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप देखील समजले नसून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

आमदार बालाजी किणीकर यांनी काय केला खुलासा?

नंदकुमार ननावरे हे पूर्वी दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याचे बोलले जात होते. मात्र या घटनेनंतर डॉ. बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ननावरे हे आपले स्वीय सहाय्यक नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चुकीचे वृत्त पसरवू नये असे आवाहन आमदार किणीकर यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT