Bihar: ‘एक झटका अन् रुळच उखडला, कुणी सीटखाली दबलं तर..’, बक्सरमध्ये भीषण रेल्वे अपघात!

रोहिणी ठोंबरे

बिहारमधील बक्सरमध्ये रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली. येथे रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली.

ADVERTISEMENT

Bihar Buxar Train Accident
Bihar Buxar Train Accident
social share
google news

Bihar Buxar Train Accident : बिहारमधील (Bihar) बक्सरमध्ये (Buxar) रघुनाथपूर स्टेशनजवळ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस (North East Express) रुळावरून घसरली. येथे रेल्वेच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या. दोन बोगी पूर्णपणे उलटल्या. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून त्यात आई आणि आठ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, तर इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (In Bihar Buxar North East Express derailed 4 People Died)

23 डब्यांसह 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने बुधवारी (11 ऑक्टोबर) सकाळी 7:40 वाजता दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गुवाहाटीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामाख्याला जाण्यासाठी सुमारे 33 तासांचा प्रवास केला. या दरम्यान, त्याच दिवशी रात्री बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ अपघात झाला.

वाचा : गरब्यात मुस्लिमांना बंदी : ‘…तर PM मोदींची जास्त पंचाईत होईल’, ठाकरेंचा हल्ला

उषा भंडारी आणि तिची आठ वर्षांची मुलगी अमृता कुमारी अशी मृतांची नावे आहेत, त्या आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादियान गावातील रहिवासी होत्या. उषा तिची मुलगी आणि पतीसोबत अन्य एका मुलीसोबत दिल्लीहून आसामला जात होती.

तिसऱ्या मृताचे नाव (27 वर्षीय) जैद असून तो बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील सप्तेय विष्णुपूरचा रहिवासी आहे. तो दिल्लीहून किशनगंजला जात होता. चौथ्या मृताची ओळख पटलेली नाही. मृतांव्यतिरिक्त 100 लोक जखमी झाले आहेत. या सर्वांवर बक्सर, भोजपूर आणि पाटणा एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp