Ajit Pawar : अजित पवारांची बॅग तपासताच, नेमकं काय सापडलं? जाणून तुम्हीही व्हाल अवाक्
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची बारामतीतल्या विमानतळावर तपासणी करण्यात आली. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामतीतल्या गावांचा गाव भेट दौरा उरकून बीडच्या सभेला जाताना बारामती हेलिपॅडवर अजित पवारांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
ADVERTISEMENT
Election Commission Check Ajit Pawar Helicopter Bags : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली आहे. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वणी आणि औसा मतदारसंघात प्रचारासाठी गेल्यानंतर हेलिपॅडवरच बॅग तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं. उद्धव ठाकरेंनी या घटनेचा व्हिडीओ स्वत: शुट केला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'माझ्यासह मिंधे, मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचीही बॅग तपासणी केल्याचे व्हिडिओ मला पाठवा,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या बॅगेत नेमकं काय सापडलं जाणून घेऊया. (maharashtra assembly election 2024 Election Commission Check NCP Ajit Pawar Helicopter Bags video viral on social media)
ADVERTISEMENT
अजित दादांच्या बॅगेत नेमकं काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची बारामतीतल्या विमानतळावर तपासणी करण्यात आली. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामतीतल्या गावांचा गाव भेट दौरा उरकून बीडच्या सभेला जाताना बारामती हेलिपॅडवर अजित पवारांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
हे वाचलं का?
अजित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरबाहेर उभे असलेले अधिकारी सीटवर ठेवलेली अजित पवारांची बॅग तपासताना दिसत आहेत.
यावेळी अजित पवारांच्या बॅगेत चकली, चिवड्याची पाकीटं सापडली. त्यानंतर निवडणूक अधिकारी जेव्हा डब्बा त्यांच्या बॅगेत ठेवत होते त्यावेळी अजित पवरांनी स्वत:हून त्यांना तो तपासायला दिला. त्यामध्ये लाडू होते. आता त्यांचा हा गंमतीदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट मोडवर!
ADVERTISEMENT
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकीय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या आरोपाची दखल घेत प्रत्येक राजकीय नेत्याच्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT