Maharashtra Weather: सुट्ट्या जाणार वाया? राज्यात कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुठे मुसळधार तर कुठे संततधार... तुमच्या शहरात परिस्थिती काय?

point

राज्यात कसा असेल पावसाचा जोर?

point

आजचा IMD चा अंदाज काय?

Mumbai Weather Forecast Today : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज (15 ऑगस्ट) हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमच्या शहरात पावसाचा जोर कसा असणार? याविषयी हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast mumbai pune rain live update news today 15 august 2024 Know the status of your state)

ADVERTISEMENT

15 ऑगस्टनंतर म्हणजे आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.

हेही वाचा : Independence Day: स्वातंत्र्यदिनी PM मोदींच्या मोठ्या घोषणा! महिला आणि तरूणांसाठी खास काय?   

कुठे मुसळधार तर कुठे संततधार... तुमच्या शहरात परिस्थिती काय?

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

तसंच, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हेही वाचा : Independence Day 2024: विकसित भारतासाठी खास प्लॅन! PM मोदींच्या नव्या संकल्पात नेमकं काय?

पुणे शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. आज पुण्यात 31°C कमाल तर 23°C किमान तापमान असेल.

ADVERTISEMENT

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT