Maharashtra Weather : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा हाहाकार, 23 जिल्ह्यांचं खरं नाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सक्रियतेत वाढ होण्याची अधिक शक्यता असून हवामान विभागाने 31 मे रोजी राज्यातील विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. अशातच विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवलेला आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सक्रियतेत वाढ होण्याची शक्यता

point

अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सक्रियतेत वाढ होण्याची अधिक शक्यता असून हवामान विभागाने 31 मे रोजी राज्यातील विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. अशातच विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवलेला आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे ही वाचा :  पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून चेष्टा

कोकण 

कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असातच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. उष्माघातापासून संरक्षणाची खबरदारी घ्यावी. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी या  जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

हे वाचलं का?