Maharashtra Weather: गौरी-गणपतीच्या विसर्जनाला आज कसं असणार वातावरण? पाहा IMD रिपोर्ट

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार धडक दिली आहे.

point

गणेशोत्सवात जोरदार पावासाने हजेरी लावली

point

आजचा हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार धडक दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आता पुन्हा सक्रिय झाल्याने गणेशोत्सवात जोरदार पावासाने हजेरी लावली आहे. अशावेळी आज (12 सप्टेंबर 2024) गौरी-गणपतीच्या विसर्जनाला पावसाची स्थिती कशी असणार? जाणून घेऊयात. (maharashtra Weather update today IMD alert 12 september 2024 weather report mumbai pune kokan)

ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होणार असल्याचे IMD कडून सांगण्यात आले आहे. वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहणार आहे. राज्यात ठिकठिकाणी सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात जोरदार सुरू आहेत. 

हेही वाचा : Malaika Arora Father Suicide: कोण होते मलायकाचे वडील? वाचा Inside Story

मुंबईत हवामानाचा अंदाज काय?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार?

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कायम असणार आहे. पुण्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सणात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाणे वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Horoscope In Marathi : आज 'या' राशीच्या लोकांवर लक्ष्मीची राहील प्रचंड कृपा, होतील मालामाल! पण...

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT