Monsoon 2024 : गुड न्यूज! 'या' दिवशी मान्सून येणार महाराष्ट्रात

मुंबई तक

ADVERTISEMENT

monsoon upadate maharashtra 2024 monsoon reach kerla today imd says condition weather update
येत्या 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे.
social share
google news

Maharashtra Monsoon Update : उन्हाच्या कडाक्याने आणि काहिलीने सध्या संपूर्ण महाराष्ट्र घामाघुम झाला आहे. या काहिलीपासून सूटका मिळवण्यासाठी सगळ्यांचेच लक्ष आभाळाकडे लागले आहे. अशा परीस्थितीत हवामान खात्याने (IMD) चांगली बातमी दिली आहे. येत्या 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे.त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात (maharashtra) देखील पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. (monsoon upadate maharashtra 2024 monsoon reach kerla today imd says condition weather update) 

कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झालेल्या नागरीकांसाठी हवामान खात्याने चांगली बातमी दिली आहे. आज 29 मे ते 30 मे दरम्यान कधीही मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो. एकूणच येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील.केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला आहे. राज्यात मान्सूनची सामान्य तारीख 1 जून आहे. तथापि, 3-4 दिवस पुढे किंवा मागे होणे हे सामान्य मानले जाते. 

हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha : महायुतीच्या 20 जागा धोक्यात, 'या' चुका भोवणार?

हवामान खात्यानुसार यावेळी मान्सून केरळमध्ये 30 मे रोजी दाखल होऊ शकतो. यानंतर राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. साधारणपणे ते एका लाटेसह उत्तरेकडे सरकते आणि 15 जुलैच्या सुमारास संपूर्ण देश व्यापते. याआधी 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता. या वेळी मान्सून नेहमीपेक्षा 3 दिवस आधी म्हणजे 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला. तर महाराष्ट्रात 10 जूनपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोणत्या राज्यात किती तारखेला पावसाचं आगमन? 

केरळ, तमिळनाडू 1 जून
कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसाम 5 जून 
महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल 10 जून
गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओरीसा, झारखंड आणि बिहार 15 जून
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर 25 जून 
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब 30 जून 
राजस्थान 5 जूलै 

हे ही वाचा : नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता; अमरावतीबद्दल मोठी अपडेट

देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, जी यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. त्यामुळे वेळेआधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. त्याचवेळी, ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD) परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, जे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT