अजित पवार, जयंत पाटलांच्या सोलापूर दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी दिला झटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

before the Ncp state president jayant patil and ajip pawar visit party leader joined shinde's shiv sena.
before the Ncp state president jayant patil and ajip pawar visit party leader joined shinde's shiv sena.
social share
google news

Maharashtra Political News in Marathi : राज्यात होऊ घातलेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपापला विस्तार करण्यावर जोर दिला (political news of maharashtra) असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही पक्षबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही महत्त्वाच्या नेत्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. (latest update on maharashtra politics)

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदारसंघाचा आढावा सुरू केला आहे. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी रणनीतीबद्दल बैठका सुरू असून, पक्ष विस्तारावर जोर दिला जात आहे. अशातच सोलापुरातील एका नेत्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आणि एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आज (1 जून) सोलापुरात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा आहे. या दौऱ्याच्या तोंडावरच राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

maharashtra politics : कोणत्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी सोडली?

मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीतील विविध पदाधिकारी हे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना बघायला मिळत आहेत. आज सोलापुरात शिवसेनेत (शिंदे गट) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला.यावेळी राष्ट्रवादीचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि व्यसनमुक्ती सेलचे सरचिटणीसासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष ज्योतिबा गुंड, दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष गणेश छत्रबंद, व्यसनमुक्ती सेलचे शहर सरचिटणीस श्रवण ढवळगी, शशिकांत डोलारे, राहुल मुदगल आदींसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, शहर समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा >> sakshi murder : ‘प्रविणसाठी ती मला वापरत होती अन्…’, साहिलने पोलिसांना सगळंच सांगितलं

शिवसेनेकडून पक्ष वाढीवर भर

शिवसेनेकडून राज्यात पक्ष वाढवण्यावर भर दिला जात आहे. अलिकडच्या काही काळात विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मताधार वाढताना दिसत नाहीये. त्यामुळे शिवसेनेकडून राज्यातील ग्रामीण भागातही पक्षबांधणीवर लक्ष दिलं जात असून, विविध पक्षातील नेत्यांना दिला जाणारा प्रवेश याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT