'State Bank of India'मध्ये बंपर भरती... मिळेल झापूक-झुपूक पगार, फक्त अर्जाची तारीख नका विसरू!
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून देशभरातील तरुणांसाठी क्लर्क पदाच्या 6589 रिक्त जागांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
SBI कडून 6589 रिक्त पदांसाठी भरती
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Bank Vacancy: सरकारी बँकेत नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून देशभरातील तरुणांसाठी क्लर्क पदाच्या 6589 रिक्त जागांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रात पदवीची डिग्री असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात.
'या' पदांसाठी निघाली भरती
या भरतीअंतर्गत 5180 नियमित तर 1409 बॅकलॉग अशा एकूण 6589 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे समावेश आहे. ही भरती राज्यनिहाय केली जाणार असून वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वेगवेगळ्या रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. एसबीआय लिपिक भरती 2025 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एसबीआयच्या वेतन रचनेनुसार 24,050 ते 64,480 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल.
शैक्षणिक पात्रता
एसबीआय लिपिक भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) ची डिग्री असणं आवश्यक आहे. या पदासाठी कार्याचा अनुभव अनिवार्य नसल्याने पदवीधर असलेले तरुण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकतात.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांचं किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC) आणि अपंग व्यक्ती (PwD) प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.










