Ahmednagar News : खासदार निलेश लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात गाडी फोडली अन्...

मुंबई तक

Attack on Nilesh Lanke PA : आज सकाळी विखे समर्थक असलेले पारनेर येथील विजय सदाशिव ओटी यांच्या एका समर्थकाला सोशल मिडीयावर निलेश लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लंके समर्थक राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे मारहाण केली होती.

ADVERTISEMENT

 निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
nilesh lanke pa attcack ahmednagar lok sabha election rahul zavare injured ahmednagar story
social share
google news

Attack on Nilesh Lanke PA : अहमदनगर लोकसभा मतदार (Ahmednagar Lok Sabha) संघातून जिंकून आलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे. दोनच दिवसांपुर्वी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निलेश लंके विजयी झाले आहेत. त्यानंतर ही घटना घडल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ माजली आहे. (nilesh lanke pa attcack ahmednagar lok sabha election rahul zavare injured ahmednagar story) 

अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या हल्ल्यानंतर राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.तसेच त्यांना नगर येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

हे ही वाचा : Baramati Lok Sabha : अजित पवारांचा मतदारसंघच धोक्यात! बारामतीकरांचा 'मेसेज' काय?

दरम्यान आज सकाळी विखे समर्थक असलेले पारनेर येथील विजय सदाशिव ओटी यांच्या एका समर्थकाला सोशल मिडीयावर निलेश लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लंके समर्थक राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे मारहाण केली होती. या मारहाणीनंतर राहुल झावरे व कार्यकत्ते पारनेर येथे आले असता विखे समर्थक असेलेले विजय ओटी यांनी राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ माजली आहे. 

हे ही वाचा : मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव?

हे वाचलं का?

    follow whatsapp