कामाची बातमी: PNR स्टेटस आणि तिकीट कन्फर्मेशन कुठे आणि कसं चेक करायचं? ‘या’ टिप्स करा फॉलो
रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही हे अनेकदा काही जणांना समजत नाही. ते नेमकं कसं तपासायचं हेच आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT

मुंबई: जर तुम्ही ट्रेनचं तिकीट काढलंय मात्र ते वेटिंग लिस्टमध्ये असेल तर अजिबात चिंता करु नका. PNR स्टेटस चेक करुन तुमच्या तिकीट कन्फर्मेशनबद्दल तुम्ही माहित करुन घेऊ शकता. योग्य नियोजन आणि माहितीमुळे तुमचा प्रवास सोयीस्कर होतो. जर तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलंय आणि तुमचं तिकीट वेटिंग लिस्ट किंवा रिजर्वेशन अगेंस्ट कँसलेशन (RAC) मध्ये असेल तर तुमच्या डोक्यात तिकीट कन्फर्म होणार की नाही? असा प्रश्न नक्की येत असेल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
PNR स्टेटस म्हणजे नेमकं काय? कसं चेक करायचं?
PNR (Passenger Name Record) हा एक 10 अंकी यूनिक नंबर असतो. यामध्ये तुमच्या तिकीटाची पूर्ण माहिती स्टोर केलेली असते. या नंबरवरुन तुमचं तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही हे तुम्ही चेक करु शकता.
हे ही वाचा>> कामाची बातमी: आधार कार्डमधील कोणते बदल ऑनलाईन आणि कोणते Aadhar सेंटरमध्ये?
PNR स्टेटस चेक करण्याच्या स्टेप्स
- IRCTC च्या वेबसाइट म्हणजेच (www.irctc.co.in) वर लॉग इन करा.
- रेल्वेची अधिकृत साइट (www.indianrail.gov.in) वरुन चेक करा.
- रेल्वे कनेक्ट अॅप किंवा Paytm, ConfirmTkt, Ixigo सारख्या अॅपवरुनसुद्धा तुम्ही PNR स्टेटस चेक करु शकता.
- याव्यतिरिक्त, 139 वर कॉल किंवा SMS करुन यासंबंधीची माहिती मिळवू शकता.
तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कशी कळेल?
कन्फर्मेशनच्या शक्यतेविषयी जाणून घ्यायचे असल्यास काही महत्त्वाच्या बाबी माहीत असणे आवश्यक आहे.
वेटिंग लिस्ट आणि RAC चा अर्थ
- GNWL (जनरल वेटिंग लिस्ट) : तिकीट कन्फर्म होण्याची सर्वाधिक शक्यता
- RLWL (रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट): लहान स्थानकांवरुन बुकिंग करण्यासाठी कन्फर्मेशनची शक्यता कमी असते.
- PQWL (पूल क्वोटा वेटिंग लिस्ट): ग्रुप तिकीटांसाठी सर्वात कमी शक्यता.
हे ही वाचा>> कामाची बातमी: PAN 2.0 हे नवं पॅन कार्ड आहे तरी काय, सरकारला का करावं लागलं लाँच?
ट्रेन आणि रूटनुसार कन्फर्मेशनची शक्यता
जर ट्रेन मेट्रो सिटी किंवा मोठ्या जंक्शनमधून चालत असेल तर कन्फर्मेशनची शक्यता जास्त असते.










