Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षणासाठी विखे पाटलांवर उधळला भंडारा
Radhakrishna Vikhe Patil : राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असतानाच धनगर आरक्षणासाठी आता सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळल्याचा प्रकार सोलापूरात घडला आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
Radhakrishna Vikhe Patil : यळकोट यळकोट, जय मल्हार म्हणत शंकर बंगाळे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या सुरक्षारक्षकांनी शंकर बंगाळे यांना लाथ्याबुक्यांनी मारहाण करत त्याला ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar arkashan) मुद्दा प्रचंड गाजतो आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे धनगर कृती समितीचा कार्यकर्ता शंकर बंगाळे यांनी त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहावर थांबला होता. त्यानंतर त्यांनी भेटण्याची विनंती केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भेटायला बोलवले होते. त्यावेळी हा सारा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
अध्यादेशानंतर हा मुद्दा
राज्यात सध्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अध्यादेश काढण्यात आला. मात्र त्यावरही जरांगे पाटील यांनी आक्षेप घेत त्यात काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. एकीकडे हे प्रकरण तापले असतानाचा धनगर आरक्षणाचा मुद्याही गाजतो आहे.
हे ही वाचा >> Chhatrapati Shivaji maharaj : अफजल खान वधातील महाराजांची ‘ती’ वाघनखं आता मायभूमीत येणार
विखे-पाटलांनी निवेदन घेतले
आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि धनगर कृती समाजाचा कार्यकर्ता शंकर बंगाळे सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी थांबला होता. त्यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर थांबला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना बोलवून घेतले.
हे वाचलं का?
अन् भंडारा उधळला
यावेळी शंकर बंगाळे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षण संदर्भात निवेदनही दिले, हे निवेदन पाहत असतानाच शंकर बंगाळे यांनी खिशातून भंडारा काढून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळला. त्यावेळी सुरक्षारक्षकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर बंगाळे यांना मंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळल्याने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली.
याआधीही बंगाळेंकडून उधळण
शंकर बंगाळे या कार्यकर्त्याने याआधीही माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळला होता. त्यानंतर त्याने आता दुसऱ्यांदा आज हा प्रकार केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Rain Update : राज्यात दोन दिवसात सर्वत्र पाऊस, बळीराजाला मिळणार दिलासा
कारवाई करु नका
सोलापूरचे पालकमंत्री विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला असला तरी त्यावर विखे पाटील यांनी आता पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. शंकर बंगाळे या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करु नका, त्याच्यावर कारवाईही करु नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली आहे. त्याने काही चुकीचे केले आहे असं मला काही वाटत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT