Supreme Court: ‘दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश’; राज ठाकरे भडकले, ‘मूठभर व्यापाऱ्यांनी…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

raj thackeray mns reaction install marathi plates in supreme court order to traders
raj thackeray mns reaction install marathi plates in supreme court order to traders
social share
google news

महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme court) दिले आहेत. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कौतुक केले आहे. त्याचसोबत सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले आहे. (raj thackeray mns reaction install marathi plates in supreme court order to traders)

ADVERTISEMENT

राज्यातील दुकानांवर 2 महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कौतुक केले आहे. तसेच दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला, त्या संघर्षाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मान्यताच मिळाल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : Video: बापरे! ठाण्यात किचनच्या खिडकीतून घरात शिरला महाकाय साप

राज ठाकरे यांनी या ट्वीटमध्ये व्यापाऱ्यांनी देखील सुनावले आहे. मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? असा सतंप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच महाराष्ट्रात असाल तर मराठीत, इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असा दमच राज ठाकरेंनी यावेळी भरला.

हे वाचलं का?

राज ठाकरेंच्या ट्वीटमध्ये काय?

पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.  त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.

ADVERTISEMENT

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘फडणवीसांनी हात ओढला पण…’, ‘त्या’ व्हिडीओची नेमकी सत्यता आली समोर

असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे.

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका.’मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत, असे आवाहन शेवटी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT