₹2000 नोटेबद्दल मोठी अपडेट! RBI ने ‘त्या’ नागरिकांना दिला दिलासा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rbi extend last date of exchange rs 2000 bank note new deadline 7 october rbi circular
rbi extend last date of exchange rs 2000 bank note new deadline 7 october rbi circular
social share
google news

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2 हजाराच्या नोटेबाबत आता मोठी माहिती दिली आहे. ही 2 हजाराची नोट येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जाऊन बदलण्याचे आदेश आरबीआयने नागरीकांना दिले होते. त्यानुसार आज 2 हजाराची नोटा बदलण्याची मुदत संपली आहे. परंतू मुदत संपून देखील अद्याप ज्या व्यक्तींनी त्यांच्याकडील 2 हजाराच्या नोटा बदलल्या नाही आहेत, त्यांना आता आरबीआयने मुदतवाढ देत दिलासा दिला आहे. (rbi extend last date of exchange rs 2000 bank note new deadline 7 october rbi circular)

ADVERTISEMENT

आरबीआयने त्या नागरीकांना मोठा दिलासा दिला आहे ज्यांनी आतापर्यंत चलनातून बाद झालेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या नाही आहेत. आरबीआयने आता नोटा बदलण्याची अंतिम मुदत येत्या 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरीकांना आता 7 ऑक्टोबर पर्यंत नोटा बदलता येणार आहेत. यापूर्वी आरबीआयने नोटा बदलण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 दिली होती. ही मुदत आज संपली होती, त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे ही वाचा : Eid-e-Milad: ईद-मिलादच्या मिरवणुकीत हवेत भिरवकला झेंडा अन् तरुणाने जागीच गमवला जीव!

आरबीआयच्या परिपत्रकात काय?

RBI नुसार 2000 च्या नोटा कायदेशीर राहतील. जर एखाद्या व्यक्तीकडे त्या 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या जवळच्या बँकेत किंवा आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन ते सहजपणे ते बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात आरबीआयने सांगितले की, चलनातून बाहेर काढलेल्या या नोटा आता 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत बँकांमध्ये जमा केल्या जाऊ शकतात आणि इतर नोटांसोबत बदलल्या जाऊ शकतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime : हाताची बोट छाटली, मुंडकं धडावेगळे…अनैतिक संबंधातून भयंकर हत्याकांड

7 ऑक्टोबर नंतर काय?

तसेच जर 7 ऑक्टोबरची नवीन मुदत संपल्यानंतरही तुम्हाला नोटा बदलता आल्या नाही, म्हणजेच तुमच्याकडे 2 हजाराच्या नोटा राहिल्या, तर ना तुम्हाला त्या बँकेत जमा करता येणार आहेत, ना बदलता येणार आहेत. अशा व्यक्तींना थेट 7 ऑक्टोबरनंतर आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमधून नोटा बदलून घेता येतील, असे सांगण्यात आले आहे.

आरबीआयने 19 मे 2023 ला 2,000 रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली होती आणि ती चलनातून बाहेर काढली होती. जेव्हा केंद्रीय बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती, तेव्हा डेटा सादर करताना म्हटले होते की RBI नुसार 31 मार्च 2023 पर्यंत 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT