Santosh Bangar: “…तर मी भर चौकात फाशी घेईन”; शिंदेंच्या आमदारांचं चॅलेंज
Santosh Bangar latest news : “आजही मी तुम्हाला सांगतो… आता एप्रिलमध्ये येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, छाती ठोकून सांगतो की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार”, असे भाकित शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : Maharashtra Politics, Santosh Bangar News : भडक विधानं करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आता फाशी घेण्याबद्दल विधान केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना आम्हीच मूळ शिवसेना आहोत, या शिंदेंच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलं. या निकालानंतर हिंगोलीत एकनाथ शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना संतोष बांगर यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर मी भर चौकात फाशी घेईन, असे विधान केले.
ADVERTISEMENT
ठाकरे गट आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते. अध्यक्षांनी १० जानेवारी रोजी या प्रकरणावरील निकाल देताना शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालानंतर शिंदे समर्थक शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष केला.
संतोष बांगरांचं ते विधान काय?
हिंगोलीतही निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, “माझा जो कडवट शिवसैनिक आहे, त्या शिवसैनिकाला फक्त धनुष्यबाण लागतो. मग हे (ठाकरे गट) म्हणतील आमच्याकडे मशाल आहे, कुणी म्हणेल आमच्या कडे अमकं आहे, कुणी म्हणेल तमकं आहे. काही म्हणतील, पण याचा कुठलाही फरक पडत नाही आणि आज महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> Maharashtra BJP : “ठाकरे, राऊत आता तरी शहाणे व्हा, हा तमाशा बंद करा”
“महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं आहे की, शिवसेना कोणती? हिंदुत्ववादी संघटना कोणती? आज मला वाटतं की, सर्वसामान्य जनता आणि घराघरांत सगळ्यांना माहिती आहे की, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडून द्यायचं आहे.”
हेही वाचा >> CM Shinde Exclusive: ‘नार्वेकरांनी ‘तो’ निर्णय दबावाखाली घेतला..’, मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
“२०२४ ला ठामपणे… छाती ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की, निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आजही मी तुम्हाला सांगतो… आता एप्रिलमध्ये येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, छाती ठोकून सांगतो की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचे पंतप्रधान झाले नाही, तर हा संतोष बांगर भर चौकात फाशी घेईन. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाही”, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT