शिवाजी महाराज वाघनखे : लंडनच्या संग्रहालयातील ‘ती’ वाघनखं खरी की खोटी, वाद काय?
shivaji maharaj wagh nakh controversy in marathi : लंडनमधील संग्रहालयातील वाघनखं खरी की खोटी असा वाद सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं याबद्दल इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. यात आता राजकीय नेत्यांनीही शंका उपस्थित केल्या आहेत.
ADVERTISEMENT
Shivaji Maharaj Wagh Nakh Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. लंडनमधील संग्रहालयात ही वाघनखे असून, ती परत आणली जाणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून नवा वाद उभा राहिला आहे. यावरून राजकारण तापू लागलं आहे. इतिहासातील काही दाखले देत याबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इतिहास अभ्यासकांचे दाखले दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (The Wagh Nakh weapon was famously used by Chhatrapati Shivaji Maharaj to kill Bijapur Sultanate’s general, Afzal Khan, in 1659.)
ADVERTISEMENT
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लंडन येथील वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी रवाना होण्यापूर्वी सांगितलं. त्यानंतर हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
“शिवरायांचं नाव घेऊन फसवाफसवी केलीत तर महागात पडेल!”
वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचा विषयाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिवसेनेने (युबीटी) एक ट्विट केले, ज्यात म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतभरातल्या शिवभक्तांसाठी शिवरायांपेक्षा मोठं काहीच नाही!”
हे वाचलं का?
“पण, म्हणून आमच्या भावनांशी खेळू नका. अर्धसत्य सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजू नका! लंडनच्या वस्तू संग्रहालयात जर खरंच शिवरायांचीच वाघनखं असतील, तर ती कायमस्वरूपी महाराष्ट्रात यायला हवीत आणि त्या वाघनखांचा सन्मान रहावा, यासाठी शिवछत्रपतींचं मंदिर उभारून त्यात ती ठेवण्यात यावी”, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण, ती खरी आहे का? अशी शंकाही शिवसेनेने अप्रत्यक्षपणे उपस्थित केली आहे.
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
पुढे म्हटलं आहे की, “पण जर का ती वाघनखं शिवरायांची असल्याचा पुरावा नसेल, तर भावनांशी खेळत जनतेला मूळ विषयांपासून भरकटवण्यासाठी तोतयेपणा करू नका. शिवरायांचं नाव घेऊन फसवाफसवी केलीत, तर महागात पडेल”, अशी भूमिका शिवसेनेने (युबीटी) मांडली.
शिवरायांचं नाव घेऊन फसवाफसवी केलीत तर महागात पडेल! pic.twitter.com/czbCznxW14
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 30, 2023
ADVERTISEMENT
“वाघनखांशी ग्रॅण्ड डफशी संबंध नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप काय?
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं. ज्यात ते म्हणतात, “इतिहासामध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे स्त्रोत्र. समकालीन बखरी, त्याबाबत इतिहासातून मिळालेली माहिती. त्यामुळे आताची जी वाघनखं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं असं म्हणून आणत आहेत. हा केवळ मतांच्या राजकारणासाठी चाललेला खेळ आहे. ती वाघनखं ज्या दिवशी वापरण्यात आली. त्यानंतरची वर्षे मोजली आणि त्या वाखनखांचे शेवटचे अस्तित्व कुठे होत हे पाहिलं तर Grand Duff चा आणि या वाघनखांचा काहीएक संबंध येत नाही.”
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड पुढे असंही म्हणाले की, “त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू यांचं बाजारीकरण करुन मतं मिळवायची हा ढोंगीपणा सरकारने सोडावा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत, दिशादर्शक आहेत.” ते कोणापेक्षाही कमी होऊच शकतं नाहीत.”
हेही वाचा >> History of Pav Bhaji : मुंबईत पावभाजी कशी बनली फेमस स्ट्रीट फूड? आहे अमेरिका कनेक्शन
“महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा आणि जगात कुठेही गेल्यानंतर एक नाव घेतल्यानंतर पूर्ण जग ज्यांच्यासमोर झुकतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आपण आहोत याचं प्रत्येक मराठी माणसाला कौतुक आहे. पण, म्हणून खोट-नाट करुन त्याच रुपांतर मतामध्ये करता येईल असं जर कोणाला वाटत असेल तर ते शक्यच नाही. इतिहासाचे आभ्यासक इंद्रजित सावंत ह्यांचा व्हिडिओ जरूर ऐका…कटू आहे पण सत्य आहे”, असं म्हणत आव्हाडांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे. (हा व्हिडीओ खाली बघता येईल)
इतिहासामध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे स्त्रोत्र. समकालीन बखरी, त्याबाबत इतिहासातून मिळालेली माहिती. त्यामुळे आताची जी वाघनखं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं असं म्हणून आणत आहेत हा केवळ मतांच्या राजकारणासाठी चाललेला खेळ आहे. ती वाघनखं ज्या दिवशी वापरण्यात… pic.twitter.com/JgTN7R40vg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 30, 2023
‘श्री राजा शिवछत्रपती’ पुस्तकाचा आव्हाडांनी दिला दाखला
आव्हाडांनी आणखी एक दाखला दिला आहे. ते म्हणतात, “गजानन मेहंदळे या थोर इतिहासकाराने आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये पान क्र. 1238 वर स्पष्टपणाने लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान ला मारण्यासाठी वाघनखे वापरली हे कुठेही स्पष्ट होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा निघतो की, अफजल खान ला मारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरलीच नाहीत. आता गजानन मेहंदळे हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. सरकार ह्यावर काही विशेष टिपण्णी करेल का?”, असा सवाल त्यांनी केला आहे.
हेही वाचा >> Kala Pani Jail : अंगावर येतो काटा… सावरकरांना ठेवलेल्या काळा पाणी तुरुंगाचा इतिहास काय?
गजानन मेहंदळे या थोर इतिहासकाराने आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये पान क्र. 1238 वर स्पष्टपणाने लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान ला मारण्यासाठी वाघनखे वापरली हे कुठेही स्पष्ट होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा निघतो की, अफजल खान ला मारताना छत्रपती शिवाजी… pic.twitter.com/U1HRlnJx1w
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 30, 2023
इंद्रजित सावंत यांचं म्हणणं काय?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या मते, “शिवछत्रपतींनी अफजल खान वधाच्या वेळी जे वाघनखं नावाचं शस्त्र वापरलं. ते शस्त्र कुठलं आहे, कुठे आहे, याविषयीची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण ते शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी उपलब्ध आहेत. पण, आता जे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमधील जी वाघनखं तीन वर्षासाठी सरकार इथे आणणार आहे. ती वाघनखं शिवछत्रपती अफजल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत.”
हेही वाचा >> अजित पवार-छगन भुजबळांमध्ये शिंदेंसमोरच ‘जुपंली’; ‘त्या’ बैठकीत काय घडलं?
“कारण 1919 पर्यंतच्या नोंदी आणि छायाचित्र असतील. तर 1919 च्या अगोदरच व्हिक्टोरिया म्युझियमध्ये जमा झालेलं वाघनखं छत्रपतींची असू शकत नाही. ज्या ग्रॅण्ड डफने ते वाघनखे तिथे दिले आहेत. ते वाघनखं सातारकर छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराज म्हणून व्यक्ती बसवलेली होती. प्रतापसिंह महाराजांनी ग्रॅण्ड डफच्या इतिहासकाराला दिलेलं वाघनखं त्याच्या नातवाने त्या म्युझियमला भेट दिलेलं आहे. तशी स्पष्ट नोंद तिथे आहे. ती वाघनखं शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं आहेत, अशी नोंद नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं आम्ही परत आणतोय, असे म्हटलं जातंय. ते साफ खोटं आहे”, असं त्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT