ऑफिस असो की घर, वेळीच व्हा सावध! जास्त वेळ बसल्याने ‘या’ गंभीर आजारांचा धोका
जास्त वेळ बसल्याने रक्ताभिसरण बिघडते. शरीराच्या खालच्या भागात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
ADVERTISEMENT

Sitting for too long causes : ऑफिसच्या डेस्कवर बसून बराच वेळ काम करणे, घरात सतत टीव्ही पाहणे किंवा इकडे तिकडे बसणे यामुळे तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्या तर येतातच पण हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. मद्यपान, धुम्रपान आणि जंक फूड प्रमाणेच, दीर्घकाळ बसणे देखील हृदयविकारांसह जुनाट आजारांसाठी धोकादायक कारण आहे. खरं म्हणजे, जेव्हा तुम्ही सतत बसून राहता तेव्हा तुमच्या शरीरात केवळ कॅलरीच साठत नाहीत, तर तुमची हाडे आणि स्नायूंनाही धोका निर्माण होतो. (when you keep sitting continuously, then not only calories are stored in your body but you are also creating danger for your bones and muscles.)
जेव्हा एखादी व्यक्ती हालचाल न करता एकाच स्थितीत बराच वेळ बसते, तेव्हा त्याचा रक्ताभिसरण आणि रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या पुढील गंभीर समस्या उद्भवू शकतात.
वाचा >> फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…
गाझियाबादमधील मणिपाल हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी कन्सल्टंट डॉ. अभिषेक सिंग यांच्या मते, ‘दैनंदिन जीवनात हळूहळू बदल होत असताना, बहुतेक लोक एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ घालवतात. अनेक लोक त्यांच्या डेस्कवर, स्क्रीनसमोर, दीर्घकाळ बसलेले असतात; त्यांच्यासाठी बैठी जीवनशैली सामान्य झाली आहे. जर कोणी असे केले तर ते धूम्रपान करण्यासारखे धोकादायक आहे. त्यामुळे कोणकोणत्या पद्धतींमुळे जास्त बसणे तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.’
वाचा >> Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…
चला तर मग जाणून घेऊया की जास्त वेळ बसल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.