Nawab Malik : ईडीचा विरोध मावळला! मलिकांना मिळाला ‘सुप्रीम’ दिलासा
Nawab malik Suprme court : नवाब मलिक यांनी जामीन वाढवून देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीने विरोध न केल्याने न्यायालयाने जामीन वाढवून दिला.
ADVERTISEMENT

Nawab Malik gets relife In Supreme Court : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम जामिनाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. जामीन वाढवून मिळण्याच्या मागणीला सक्तवसुली संचालनालयाने विरोध न केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (Nawab Malik Bail extends by supreme court)
नवाब मलिकांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाह वली खान, सलीम पटेलकडून कोट्यवधी रुपयांची जमीन ३० लाखांत खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. याच प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मलिकांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचा >> ‘..म्हणून मलिकांना जामीन’, पृथ्वीराज चव्हाणांना ‘तो’ संशय; गंभीर आरोप
मलिकांच्या जामिनाला सहा महिन्यांची मुदतवाढ
११ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन दिला. त्यानंतर मलिकांच्या जामिनाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मलिकांच्या जामिनावर तीन वेळा सुनावणी झाली, या तिन्हीवेळा ईडीने विरोध केला नाही. ११ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, पण ईडीने विरोध न केल्याने यावर शंका उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईडीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती. “नवाब मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचा संशय आहे. नवाब मालिकांना राजकीय दबाव आणून भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. सीबीआय आणि ईडीच्या यंत्रणांनी आता जामिनाला विरोध का केला नाही? याआधी त्यांनी विरोध केला होता. पण आताच विरोध का केला नाही?”, असे प्रश्न चव्हाण यांनी ईडीच्या मावळलेल्या विरोधावर केले होते.