Anantnag Encounter : दोन चिमुकली मुलं… शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांची ह्रदयद्रावक कहाणी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Jammu and Kashmir anantnag encounter : two army officers Colonel Manpreet Singh, Battalion Commander Major Ashish Dhonak and DSP Humayun Bhat were martyred.
Jammu and Kashmir anantnag encounter : two army officers Colonel Manpreet Singh, Battalion Commander Major Ashish Dhonak and DSP Humayun Bhat were martyred.
social share
google news

Anantnag Encounter latest news Manpreet Singh : ‘भावाने मला एक काम दिले होते. त्याच्याशी सहा दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. काल मी फोन केला असता त्याने उचलला नाही. त्यानंतर आम्हाला वाईट बातमी मिळाली’, असं म्हणत अनंतनागमध्ये शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांचा भाऊ संदीप सिंग हे रडू लागले. “भाऊ नेहमी आमच्या फोनला उत्तर देत असे. तो व्यस्त असला तरी तो आमच्याशी नंतर बोलू असे सांगायचा. मात्र यावेळी त्याने फोन उचलला नाही. मला वाटलं तो बिझी असावा. पण, भाऊ शहीद झाला असेल असं मला कधीच वाटले नव्हते”, असे सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी आणि एक डीएसपी शहीद झाले. कर्नल मनप्रीत सिंग यांचाही त्यात समावेश होता. शहीद झाल्याची बातमी कर्नल मनप्रीत यांच्या घरी धडकली आणि शोककळा पसरली. घरातील लोकांनी हंबरडा फोडला, तर शेजारांचे डोळेही भरून आले.

‘आज तक’शी बोलताना कर्नल मनप्रीत यांचा भाऊ संदीप सिंग यांनी भावना व्यक्त केल्या. ‘मी पाच-सहा दिवसांपूर्वी त्याच्याशी बोललो होतो’, असे त्यांनी सांगितलं. ‘त्याला बुक बायडिंगचे काम करायचे होते. मी बुधवारी (13 सप्टेंबर) फोन केला असता त्याने उचलला नाही. तो नेहमी कॉल्सला प्रतिसाद द्यायचा. मात्र, यावेळी त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर आम्हाला तो शहीद झाल्याची बातमी कळली.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कर्नल मनप्रीत हे गेल्या चार वर्षांपासून अनंतनागमध्ये तैनात होते. ते 19RR CO शीख रेजिमेंटमध्ये सेवा देत होते. त्यांचे वडीलही सैन्यात होते. 2014 मध्ये आजारपणाने त्यांचे निधन झाले.

मनप्रीत सिंग यांचे 2016 मध्ये झाले होते लग्न

संदीप सिंह यांनी सांगितलं की, ‘मनप्रीत भैय्याचं कुटुंबावर खूप प्रेम होते. संपूर्ण कुटुंब मोहालीत राहते. पण वहिनी जगमीत ग्रेवाल हे शिक्षिका आहेत. त्यांची पोस्टिंग मोर्णीच्या सरकारी शाळेत आहे. त्यामुळे त्या मुलगा कबीर सिंग (6) आणि मुलगी वाणी (2.5 वर्षे) यांच्यासोबत त्यांच्या आई-वडिलांच्या घरी म्हणजेच पंचकुला येथे राहतात. कारण वहिनीची शाळा तिथून जवळच आहे. भाऊ शहीद झाल्याची माहिती यापूर्वी आम्ही वहिनींना दिली नव्हती. त्यांना नंतर याबाबत माहिती देण्यात आली. मनप्रीत सिंगचा विवाह पंचकुलामध्ये राहणाऱ्या जगमीत कौरशी 2016 मध्ये झाला होता.

ADVERTISEMENT

मनप्रीत सिंग 2005 मध्ये झाले लेफ्टनंट

मनप्रीत यांचे भाऊ संदीप यांनी सांगितलं की, 2003 मध्ये सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर भाऊ 2005 मध्ये लेफ्टनंट झाला. ट्रेनिंगसाठी जाताना मनप्रीत सिंग म्हणाले होते की, भीती काय असते हे माहित नाही. तो मृत्यूला बाजूला सारून भारत मातेची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होत आहे. मार्च 2021 मध्ये, कर्नल मनप्रीत सिंग यांना त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी शौर्य सेना पदक प्रदान करण्यात आले. मनप्रीतला लहानपणापासूनच आर्मी ऑफिसर व्हायचं होतं. त्याला कोणी विचारले तर त्याचे एकच उत्तर होते की जसे वडील सैन्यात जवान म्हणून अधिकाऱ्यांना सलाम करतात त्याचप्रमाणे एके दिवशी तो अधिकारी बनून आपल्या वडिलांच्या पाठीशी उभा राहील, मग तेच अधिकारी त्यालाही सलाम करतील.’ मनप्रीतचे वडील लखमीर सिंग हे 12 शीख लाइट इन्फंट्रीमधून हवालदार म्हणून निवृत्त झाले होते.

ADVERTISEMENT

संपूर्ण कुटुंब लष्करी पार्श्वभूमीचे

संदीप सिंह यांनी सांगितले की, तीन भावंडांमध्ये मनप्रीत हे सर्वात मोठे होते. दुसरी त्यांची बहीण संदीप कौर आणि तिसरे ते स्वतः आहेत. त्यांचे आजोबा दिवंगत शितल सिंग, त्यांचे भाऊ साधू सिंग आणि त्रिलोक सिंग हे तिघेही सैन्यातून निवृत्त झाले होते. तर त्यांचे वडील लखमीर सिंग हे सैन्यात हवालदार म्हणून रुजू झाले होते आणि हवालदार म्हणून निवृत्त झाले होते. काकाही सैन्यात गेले आहेत. यानंतर वडिलांची पंजाब विद्यापीठात सुरक्षा शाखेत नियुक्ती झाली. 2014 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे वडिलांचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या जागी सहाय्यक लिपिकाची नोकरी मिळाली. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे.

कर्नल मनप्रीत सिंग यांचे सासरे जगदेव सिंग यांनी सांगितले की, ‘मनप्रीतचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत मोहालीतील त्यांच्या घरी पोहोचेल. बुधवारी संध्याकाळी मनप्रीतची माहिती आम्हाला मिळाली. मनप्रीतला तीन वर्षांपूर्वीच बढती मिळाली होती.’ कर्नल मनप्रीत ग्रेवाल यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (14 सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनप्रीत सिंग यांची हौतात्म्याची कहाणी

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत होते. कर्नल मनप्रीत सिंग या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन लष्करी अधिकारी कर्नल मनप्रीत सिंग, बटालियन कमांडर मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT