Shirdhon: दारुबंदीवरुन महिलाच आमने-सामने, तुफान हाणामारी.. कोल्हापुरात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

two groups of women clashed over liquor ban what happened in kolhapur shirdhon village
two groups of women clashed over liquor ban what happened in kolhapur shirdhon village
social share
google news

Prohibition of alcohol in Kolhapur Village: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात ग्रामपंचायतीने गावात दारुबंदीच्या (Prohibition of alcohol) ठरावासाठी बोलाविण्यात आलेल्या महिला ग्रामसभेत ठरावावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दारुबंदीच्या विरोधात तसेच समर्थनार्थ बोलवलेल्या या बैठकीत बराच वाद झाला आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (two groups of women clashed over liquor ban what happened in kolhapur shirdhon village)

ADVERTISEMENT

दारूबंदीवरुन महिला एकमेकांना भिडल्या

सन 2016 साली शिरढोणच्या महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी गावात दोन व्यावसायिकांनी परमिट रूमसाठी परवाना मागणी केली होती. पण ग्रामपंचायत सदस्यांनी याला विरोध करत मासिक मिटिंगमध्ये महिला ग्रामसभा घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार काल (28 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता ग्रामपंचायतीसमोर महिला ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाबासाहेब हेरवाडे होते.

हे ही वाचा >> Crime: डायबिटीज असतानाही सतत मिठाई खायची,वैतागून नवऱ्याने केली हत्या

ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचताच उपस्थित बहुतांश महिलांनी दारुबंदी कायम करण्याच्या ठरावाला हात वर करुन मंजुरी दिली. मात्र, माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना कोळी यांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महिलांनी त्यांना जोरदार विरोध केल्याने महिलांच्या दोन गटात शाब्दिक वादावादी होऊन धक्काबुक्की झाली.

हे वाचलं का?

पोलिसांच्या उपस्थितीत ठराव झाला संमत

यामध्ये पुरुषांनी सहभाग घेतल्याने गोंधळ उडाला. या गोंधळात काही महिलांनी प्रोसिडिंग हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी रविराज फडणीस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी महिला व ग्रामस्थांना शांततेचं आवाहन करत सदरची ग्रामसभा महिलांची असून पुरुषांनी या ठिकाणी थांबू नये. असे सांगत त्यांना ग्रामसभेपासून बाहेर पाठवत पोलीस बंदोबस्तात सभेला सुरुवात केली.

हे ही वाचा >> Live in Partner Pressure Cooker: दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय, प्रेशर कुकरने ठेचून लिव्ह-इन पार्टरनची हत्या

यानंतर पुन्हा सरपंच हेरवाडे यांनी गावातील दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा विषय वाचताच बहुतांश महिलांनी हात उंचावून मंजुरी दिली. तर काही महिलांनी म्हणणे मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्याने पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी वाद टाळण्यासाठी सरपंच हेरवाडे यांनी सभा आटोपती घेत सभा संपल्याचे जाहीर केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT