Uddhav Thackeray : चिमुकल्याने दिली उद्धव ठाकरेंना शिदोरी, म्हणाले माझ्याकडे शब्द नाहीत
Uddhav Thackeray : पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलही शेतकरी अडचणीत सापडल्याने उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्याचा दौरा काढला आहे. यावेळी लोकांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऐन पावसाळ्यातच पावसाने दडी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी केली. शेतकऱ्यांना आता दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काकडी येथील शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या शेतीचे झालेले नुकसान आणि सरकारकडन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगत सरकारवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
ADVERTISEMENT
विद्यार्थ्याने दिली शिदोरी
शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याचे समजताच तेथील एका शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्याने त्यांच्यासाठी शिदोरी आणली होती. दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना ती शिदोरी देताच उद्धव ठाकरे यांनीही त्या विद्यार्थ्याची चौकशी केली. अरे बाळा, तू माझ्यासाठी शिदोरी आणलीस, पण तू काही खाल्लंस का? तू जेवलास का? की स्वत: न जेवता मला शिदोरी देतोयस? अशी विचारणा करत त्या विद्यार्थ्याला तू दिलेली शिदोरी मी खाईन असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘तुम्ही जर असं केलं तर आरक्षण द्यायचं कुणाला?’ जरांगे पाटलांचा भावूक सवाल
हेच आम्हाला आशिर्वाद
अहमदनगर दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी शिदोरी देणाऱ्या विद्यार्थ्याला शब्द देत तू दिलेली शिदोरी मी खाईन अशा शब्द देत त्यांनी सांगितले की, हीच आमची शिदोरी, हेच आम्हाला आशिर्वाद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हे वाचलं का?
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज नगर दौऱ्यावर असताना संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावातील शेतीची पाहणी केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घटनाबाह्य सरकारकडे तोडगा नाही. पण शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे असा… pic.twitter.com/jltXMd5OEs
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 8, 2023
ADVERTISEMENT
शिदोरीत काय..?
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे काकडीमध्ये आल्याचे कळताच शाळकरी विद्यार्थ्याने त्यांच्यासाठी शिदोरी आणली होती. त्या शिदोरीमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला शिदोरीत काय आहे हे विचारताच त्यांने लोणचं, भाकरी आणि ठेचा असल्याचे त्याने सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षणासाठी विखे पाटलांवर उधळला भंडारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT