Viral News : बापरे! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळली भलतीच गोष्ट, अन्…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

US women swallows apple air pod mistakenly vitamin pill doctor viral story
US women swallows apple air pod mistakenly vitamin pill doctor viral story
social share
google news

सोशल मीडियावरून दररोज अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने व्हिटॅमिनची गोळी समजून एअरपॉड गिळल्याची घटना घडली. हा एअरपॉड गिळल्यानंतर ज्यावेळेस महिलेच्या गळ्यात तो अडकला, त्यावेळेस तिला तिची चुक कळाली आहे. दरम्यान या एअरपॉडचे नंतर काय झाले? महिलेच्या शरिरातून त्याला यशस्वीरित्या काढण्यात आला का? हे जाणून घेऊयात. (women swallows apple air pod mistakenly vitamin pill doctor viral story)

ADVERTISEMENT

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोक इतकी व्यस्त होऊन जातात की त्यांच्या जेवणाची आणि गोळ्यांची वेळ निघून जाते. त्यामुळे घाईगडबडीत अनेकांकडून मोठ्या चुका घडतात. या चुका कधी कधी त्यांच्या जीवावरही बेतू शकतात.अशीच जीवावर बेतणारी घटना समोर आली आहे.

हे ही वाचा : Nanded Crime : जवानाने गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीचा घेतला जीव! कारण जाणून पोलिसही चक्रावले

न्युयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, रियाल्टार तन्ना बार्कर नावाची एक तरूणी तिच्या मैत्रिणीसोबत सकाळी मॉर्निक वॉकला निघाली होती. या मॉर्निग वॉक दरम्यान रियाल्टारला व्हिटॅमिनची गोळी घेण्याची आठवण झाली. ही गोळी तिने आधीच स्वत: न बाळगली होती. यावेळी मॉर्निग वॉक दरम्यान मैत्रिणीशी बातचीत करता करता रियाल्टारने व्हिटॅमिनची गोळी घेतली. यानंतर रियाल्टारने तिच्या मैत्रिणीचा निरोप घेत ती पुढे चालत निघाली. यावेळी रियाल्टरला व्हिटॅमिनची गोळी गळ्यात अडकल्याचा भास झाला. यानंतर तिने आणखीण पाणी प्यायले, तरी देखील गोळी गळ्यातून उतरलीच नाही.

हे वाचलं का?

गोळी हातातच होती…

गोळी गळ्यातून उतरत नसताना तिने तिचे हात तपासले असता, गोळी तिच्या हातातच होती. त्यामुळे तिला तिची चुक कळून चुकली. रियाल्टारने चुकून व्हिटॅमिनची गोळी खाण्याऐवजी नवऱ्याचे अ‍ॅपलचे एअरपॉड गिळले होते. त्यामुळे या घटनेने तिला मोठा धक्का बसला.

दरम्यान मॉर्निग वॉक वरून घरी परतल्यानंतर रियाल्टारने ही संपूर्ण घटना तिच्या नवऱ्याला सांगितली. यानंतर नवऱ्याने या संपूर्ण घटनेची माहिती कोणालाच न सांगण्याला सल्ला दिला.मात्र तरी देखील रियाल्टरने ही संपूर्ण घटना टिकटॉकवर तिच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange Patil: ‘…तर त्या दिवशी मी आत्महत्या करेन’, उपोषण सोडताच जरांगे-पाटलांचं तुफान भाषण

ADVERTISEMENT

रियाल्टरने हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करताच, यावर चाहते कमेंट करत आहेत. एका युझरने कमेंट केली की, मी फक्त कल्पना करतोय की तिने कशाप्रकारे एअरपॉड गिळला असेल. तर काही युझर्सनी एअरपॉड शरिरातून कसा बाहेर पडेल? असा तिला प्रश्न केला आहे. यासोबत अनेकांनी तिला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या या रियाल्टारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT