Anantnag Encounter : दोन चिमुकली मुलं… शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांची ह्रदयद्रावक कहाणी
Anantnag : कर्नल मनप्रीत सिंग या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन लष्करी अधिकारी कर्नल मनप्रीत सिंग, बटालियन कमांडर मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले.
ADVERTISEMENT

Anantnag Encounter latest news Manpreet Singh : ‘भावाने मला एक काम दिले होते. त्याच्याशी सहा दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. काल मी फोन केला असता त्याने उचलला नाही. त्यानंतर आम्हाला वाईट बातमी मिळाली’, असं म्हणत अनंतनागमध्ये शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांचा भाऊ संदीप सिंग हे रडू लागले. “भाऊ नेहमी आमच्या फोनला उत्तर देत असे. तो व्यस्त असला तरी तो आमच्याशी नंतर बोलू असे सांगायचा. मात्र यावेळी त्याने फोन उचलला नाही. मला वाटलं तो बिझी असावा. पण, भाऊ शहीद झाला असेल असं मला कधीच वाटले नव्हते”, असे सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी आणि एक डीएसपी शहीद झाले. कर्नल मनप्रीत सिंग यांचाही त्यात समावेश होता. शहीद झाल्याची बातमी कर्नल मनप्रीत यांच्या घरी धडकली आणि शोककळा पसरली. घरातील लोकांनी हंबरडा फोडला, तर शेजारांचे डोळेही भरून आले.
‘आज तक’शी बोलताना कर्नल मनप्रीत यांचा भाऊ संदीप सिंग यांनी भावना व्यक्त केल्या. ‘मी पाच-सहा दिवसांपूर्वी त्याच्याशी बोललो होतो’, असे त्यांनी सांगितलं. ‘त्याला बुक बायडिंगचे काम करायचे होते. मी बुधवारी (13 सप्टेंबर) फोन केला असता त्याने उचलला नाही. तो नेहमी कॉल्सला प्रतिसाद द्यायचा. मात्र, यावेळी त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर आम्हाला तो शहीद झाल्याची बातमी कळली.’
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कर्नल मनप्रीत हे गेल्या चार वर्षांपासून अनंतनागमध्ये तैनात होते. ते 19RR CO शीख रेजिमेंटमध्ये सेवा देत होते. त्यांचे वडीलही सैन्यात होते. 2014 मध्ये आजारपणाने त्यांचे निधन झाले.