Oyo हॉटेलमध्ये नातेवाईकासोबत अनैतिक संबध, काय घडलं हॉटेलमध्ये?
Crime: अनैतिक संबंधापायी एका महिलेला आपला हकनाक जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

Immoral Relationship and Murder: नोएडा: OYO मध्ये आपल्या प्रियकराला (Boyfriend) जाऊन भेटणं आपल्यासाठी शेवटचं ठरू शकतं याची तिळमात्र कल्पना नसलेल्या एका महिलेचा अत्यंत वेदनादायक असा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये (Noida) घडली आहे. महिला ज्या प्रियकराला भेटली तोच तिचा काळ ठरला. असा आरोप आहे की, ओयो हॉटेलमध्येच प्रियकराने महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) घडवून आणली. (immoral relationship with a relative a horrible incident with a married woman oyo hotel crime news)
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
नोएडाच्या सेक्टर 63 पोलीस ठाण्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे OYO हॉटेलमध्ये प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचे लग्न झाले होते. आता महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
प्रियकराचे होणार होते लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी होती. ती नोएडामध्ये पती आणि 2 मुलांसह राहत होती. या महिलेचे सोनू नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते, जो महिलेचा दूरचा नातेवाईक आहे.
अधिक वाचा- तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गेल्या शुक्रवारी ही महिला आपल्या प्रियकराला सेक्टर-63 छिजारसी येथील एका OYO हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेली होती. याचवेळी महिलेला समजले की, प्रियकर सोनूचे आता लग्न होणा आहे. याच मुद्द्यावरून महिला आणि प्रियकर सोनूमध्ये वाद सुरू झाला.