Crime: प्रेमविवाह करून घरी आणलेल्या सुनेने उद्योजक सासऱ्याला संपवलं?, हादरवून टाकणारी कहाणी
जयपूरमध्ये एका महिलेने तिच्या उद्योजक सासऱ्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याविरोधात पोलिसात आता तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Father-in-law Murder: जयपूर: जयपूरमध्ये (Jaipur) एक भयंकर घटना घडली असून ज्यामध्ये 6 महिन्यांपूर्वीच लग्न करुन सासरी आलेल्या सुनेवर (Daughter-in-law) आता अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक लतेश गोयल यांचा घराच्या बाल्कनीतून पडून संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मृत लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने असा आरोप केला आहे की, त्याची पत्नी स्नेहा हिने तिच्या सासऱ्यांना (father-in-law) बाल्कनीतून ढकलून त्यांची हत्या (Murder) केली. हनीने स्नेहासोबत प्रेमविवाह केला होता. (crime news allegation that the daughter in law killed the businessman father in law a shocking story love marriage)
ADVERTISEMENT
याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही महिन्यांआधीच हनी गोयलच्या आई आणि बहिणीचा देखील एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता.
वडिलांचा मृत्यू, प्रेमविवाह केलेल्या पत्नीवरच संशय
हनी गोयलने वडिलांच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ जारी थेट आरोप केला आहे की, 11 ऑगस्ट रोजी सकाळी सासरे लतेश गोयल आणि सून स्नेहा यांच्यात कशावरून तरी वाद झाला होता. त्याचवेळी स्नेहाने रागाच्या भरात धावत-धावत जात सासरे लतेश गोयल यांना 15 फूट उंच बाल्कनीतून ढकलून दिले. एवढ्या उंचावरुन थेट रस्त्यावर पडल्याने लतेश गोयल हे गंभीर जखमी झाले. ज्यानंतर त्यांना मुलगा हनी याने त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी लतेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Mumbai Crime: वृद्ध दाम्पत्याच्या तोंडाला पट्टी लावली, हात-पाय बांधले…चोरीच्या घटनेनंतर घडली भयंकर घटना
यावेळी हनीने असाही आरोप केला आहे की, एकीकडे त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु असताना दुसरीकडे स्नेहाने त्याचवेळी घरातून सोने-चांदी आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. यानंतर तिचे नातेवाईक घराबाहेर आले आणि भांडण करू लागले. तसेच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर सुनेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्यामध्ये हुंड्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआयआरनंतर या प्रकरणाची चौकशी होईल.
काय आहे संपूर्ण प्रकरण
खरं तर, 15 फेब्रुवारी 2023 रोजी जयसिंगपुरा, जयसिंगपुरा येथील नारायण धाम येथील रहिवासी व्यावसायिक लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने त्यांच्या गोडाऊनसमोर राहणाऱ्या स्नेहा डेसोबत प्रेमविवाह केला होता. पण लग्न झाल्यापासून घरात छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणे सुरू झाली होती. या सगळ्या तणावामुळे लतेश गोयल यांना दारूचे व्यसन लागले आणि ते घरी न राहता गोडाऊनमध्ये राहू लागले.
ADVERTISEMENT
10 ऑगस्टच्या रात्रीही लतेश गोयल हे मद्यपान करून गोडाऊनमध्येच थांबले होते. पण मुलाने समजवल्यानंतर ते घरी आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरात भांडण सुरू झालं आणि सून स्नेहाने सासऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यास सांगितले. यावेळी बराच वाद झाला आणि याच वादादरम्यान सून स्नेहा हिने लतेश यांना धक्का देऊन खाली ढकललं. असा आरोप पतीने केला आहे. फिर्यादी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी स्नेहा विरुद्ध प्राणघातक हल्ला आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हनीने गमावलीय आपली आई आणि बहीण.
पीडित हनीने सांगितले की, 2011 मध्ये फतेहपूर सिक्री येथे झालेल्या अपघातात त्याने आई आशा गोयल आणि बहीण निशी यांना गमावले होते. यानंतर दोघे पिता-पुत्र घरात एकत्र राहत होते. जेव्हा हनीने त्याच्या वडिलांना स्नेहा डे बाबत सांगितलं होतं तेव्हा त्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. जेणेकरून सून येईल आणि घरातील कामे सांभाळेल. अशी त्यांची अपेक्षा होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT