‘हनीट्रॅप’चा डाव! पत्रकार, पोलिसासह 4 जणांना पडल्या बेड्या!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Gadchiroli Honeytrap Case four accused arrested police takes action
Gadchiroli Honeytrap Case four accused arrested police takes action
social share
google news

Gadchiroli Honeytrap Case : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) हनीट्रॅप प्रकरणी (Honeytrap Case) कारवाई करत चार आरोपींना अटक केली. माहितीनुसार, दोन कॉल गर्ल, पोलीस हवालदार आणि पत्रकाराचा या प्रकरणात समावेश आहे. यातील दुसरी महिला फरार असून इतर चार जणांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Gadchiroli Honeytrap Case four accused arrested police takes action )

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या असिस्टंट इंजिनीअरच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली. पत्रकार रवी कांबळे, पोलीस कर्मचारी सुशील गवई, रोहित अहिर आणि दोन कॉल गर्ल्स अशी आरोपींची नावे आहेत.

वाचा : Maratha Reservation: भुजबळांचा CM शिंदेंना टोला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेवरून काय म्हणाले?

हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून इंजिनीअर तरूणाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

आरोपींनी कॉल गर्लच्या माध्यमातून इंजिनीअर तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवू, अशी धमकी दिली होती. यामुळे पीडित तरूणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या चार आरोपींना पकडलं असून एक महिला आरोपी फरार आहे. जिला लवकरच अटक करण्यात येईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा : Ranjit Savarkar : पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर आव्हाड भडकले, ‘नथुरामी प्रवृत्तीला ठेचून…’

पीडित तरूणासोबत नेमकं घडलं काय?

4 डिसेंबर रोजी तक्रारदार तरूण हिंगणघाट येथील कॉल गर्लला भेटण्यासाठी नागपुरात आला होता. यानंतर आरोपी महिला त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. जिथे आरोपींनी आधीच त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट रचला होता. यानंतर सर्व आरोपींनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT