Ulhasnagar : मासिक पाळीचं रक्त पाहून खवळला अन् भावाने 12 वर्षाच्या बहिणीला संपवलं!
Crime: 12 वर्षीय बहिणीला मासिक पाळीत झालेला रक्तस्त्राव हा फक्त अनैतिक संबंधातून झाला असावा या गैरसमजातून भावाने बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे.
ADVERTISEMENT

Ulhasnagar Crime: उल्हासनगर : मुंबईच्या नजीक असलेल्या उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या 12 वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू (Sister Death) झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना ही उल्हासनगरमध्ये घडली आहे. (in ulhasnagar brother killed his 12 year old younger sister after suspecting her character)
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात काल (मंगळवार) दुपारी 2 वाजेच्या सुमारास एका 12 वर्षीय मुलीला उपचारासाठी तिचे कुटुंबीय घेऊन आले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैदयकिय अधिकारी डॉ. प्रतिक यांनी तिला तपासल्यानंतर मयत घोषित केलं. तसेच तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने तात्काळ ह्या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देखील कळवली.
नेमकं काय घडलं?
12 वर्षीय मृत मुलगी ही आपला मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. तर तिचे आई-वडील हे गावी राहतात. मुलीची हत्या करणारा तिचा भाऊ हा सुरक्षा गार्डचं काम करतो. मुलीला काही दिवसांपूर्वीच मासिक पाळी आली होती. ज्यामुळे तिचे कपडे हे रक्ताने माखले होते. कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून भावाने आपल्या लहान बहिणीला याबाबत विचारणा केली. पण वयाने अगदीच लहान असलेल्या या मुलीला आपल्या भावाला नेमकं उत्तर देता आलं नाही.
दरम्यान, यावेळी मुलीच्या वहिनीने तिच्या पतीच्या मनात बहिणीबाबत संशयाच्या किडा सोडला. यावेळी तिने आपल्या पतीला काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या. मुलीच्या वहिनीने तिच्या पतीला असंही सांगितलं की, तुमच्या बहिणीचं काहीतरी प्रेम वैगरे सुरू आहे आणि जो काही रक्तस्त्राव होतोय तो केवळ संभोगामुळेच झाला आहे.