Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम

Baba Siddiqui Murder Incident Timeline : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काल शनिवारी (12 ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकींच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे

Baba Siddiqui Latest News Update
Baba Siddiqui Murder Case Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून तुम्हीही व्हाल थक्क

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी घेतलं दोन आरोपींना ताब्यात

point

हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर तीन राऊंड केले फायर

Baba Siddiqui Murder Incident Timeline : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काल शनिवारी (12 ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकींच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. दुसरीकडे विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. परंतु, बाबा सिद्दीकींच्या हत्येमागंच नेमकं कारण काय? ही धक्कादायक घटना कशी घडली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घेऊयात बाबा सिद्दीकींच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम

हत्येची घटना कशी घडली?

1) रात्री 9.15 ते 9.20 वाजताच्या सुमारास बाबा सिद्दीकी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले. 

2) सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या परिसरात फटाके फोडण्यात आले होते. त्याचदरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

3) फटाक्यांचा आवाज सुरु होताच तीन जण वाहनातून बाहेर उतरले आणि सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या

4) हल्लेखोरांनी सिद्दीकींवर तीन राऊंड फायर केले

5) बाबा सिद्दीकी यांच्या कार्यलयाजवळ असलेल्या राम मंदिराजवळ गोळीबाराची घटना घडली

हे ही वाचा >> Gangster Lawrence Bishnoi: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज अभिनेता लॉरेन बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या नंबरवर

6) छातीत गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दीकी खाली पडले

7) त्यानंतर लोकांनी बाबा सिद्दीकींना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल केलं

8) या धक्कादायक प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

9) पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यातं घेतलं, तर एक आरोपी फरार झाला

10) दोन्ही संशयास्पद आरोपी महाराष्ट्राबाहेरील आहेत. एक आरोपी हरियाणाचा, तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारांच्या सेवकांना जेव्हढी सुरक्षा...", बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणावर दिली मोठी प्रतिक्रिया

काल बाबा सिद्दीकींची हत्या झाली. आपल्या देशात मुंबई कदाचित एकमेव शहर असेल, ज्या मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहेत. आणखी पाच वाढवा काही हरकत नाही. जे जे त्यांचे लाडके असतील, त्या सर्वांना कमिशनर करा. पण कारभाराचं काय? महिला असुरक्षीत आहेत. राजकारणी असुरक्षीत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते असुरक्षीत आहेत. मग सामान्य जनतेचं काय? या गद्दारांच्या सेवकांना जेव्हढी सुरक्षा दिली गेली आहे, ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेसाठी का वापरत नाहीत. यांच्या घरी धुणी-भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा दिली असेल. ही सुरक्षा जनतेसाठी आहे. हे पोलीस जनतेचे रक्षक आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp