Crime: लव्ह्, सेक्स आणि धर्मांतर! अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Kanpur Crime minor girl rape and love jihad case kanpur uttar pradesh story
Kanpur Crime minor girl rape and love jihad case kanpur uttar pradesh story
social share
google news

गेल्या काही महिन्यांपासून तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून, धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मुंबई असो, उत्तर प्रदेश असो, या भागात अशा अनेक घटना याआधी घडल्या आहेत. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. या घटनेत एका मुस्लीम तरूणाने हिंदू बनून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतर करण्याचा दबाव टाकला आहे. या प्रकरणात आता अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरूणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (miror girl rape and love jihad case kanpur uttar pradesh story)

ADVERTISEMENT

घरात नेऊन बलात्कार

कानपूरच्या पनकी पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, गोविंद नगरच्या फॅक्टरीत मी काम करायचे. याच कंपनीत हमीरपूरचा रहिवासी असलेला राहुल देखील कामाला होता. या राहुलसोबत माझी मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर राहुल एकेदिवशी मला त्याच्या घरी घेऊन गेला. घरी नेऊन त्याने मला कोल्ड्रीकमध्ये गुंगीचे औषध मिसळून माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला. बलात्कारानंतर राहुलने मला मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्याशी लग्न करेन असा शब्द दिला होता.

हे ही वाचा : Yavatmal Murder : पैसे देणाऱ्याचाच गळा चिरला; मध्यस्थी करणाऱ्याचे डोके फोडले, कुटुंबीय सुन्न

फोन कॉलने भांडाफोड

पीडित मुलगी राहुलसोबत नात्यात असताना तिच्या फोनवर एका अज्ञात महिलेचा कॉल आला होता. या महिलेचे नाव रूखसार बानो होते. या महिलेने ती राहुलची बायको असल्याचा दावा केला. याचसोबत पीडित मुलगी ज्या तरूणाला राहुल समजत होती, त्या तरूणाचे नाव जहीर होते. आणि जहीरचे (राहुल) लग्न झाले आहे, आणि मी त्याची बायको आहे,अशी माहिती दिली.राहुलबाबतची ही माहिती मिळताच पीडितेला मोठा धक्का बसला, त्यानंतर तिने राहुलशी नाते तोडत त्याच्याशी संपर्क तोडला.

हे वाचलं का?

पीडितेने अचानक बोलणे बंद केल्याने राहुलला देखील धक्का बसला,त्याने अनेक नंबरवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुलने तिला इस्लाममध्ये चार लग्न करण्यास परवानगी आहे. त्यामुळे तू धर्मपरिवर्तन करून माझ्यासोबत लग्न कर. जर तु माझ्याशी लग्न केले नाहिस तर मी तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेन,अशी धमकी पीडीतेला दिली. या धमकीला घाबरून पीडितेने कामावर जाणेही बंद केले होते.

हे ही वाचा : Krishnagiri: युट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हरी…,बायकोसोबत घडली भयंकर घटना

दरम्यान या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी राहुल उर्फ जहिरच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ आरोपी जहिरला अटक केली होती. तसेच त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सूनावली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT