Mumbai: तान्ह्या बाळाला मार मार मारलं... घेतला जीव, प्रेमी युगलाने रचलेल्या अपहरणाचं बिंग कसं फुटलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिमुकल्याच्या हत्येचं गुपित कसं झालं उघड? 

Mumbai Murder Case : 'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' पण, तिच आई जेव्हा पोटच्या लेकरासाठी वैरी बनते तेव्हा?... अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत जोगेश्वरी भागातील मेघवाडी या ठिकाणी घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या 15 महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. (mumbai jogeshwari crime live in relation Couple murder 15 months child and throw body in gutter)

ADVERTISEMENT

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या प्रेमी युगलाला जोगेश्वरी भागातील मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 15 महिन्यांच्या तान्ह्या बाळाचा खून करत त्याच्या अपहरणाची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा : भाजपला महाराष्ट्र-कर्नाटकात बसणार झटका? सरदेसाईंचा अंदाज काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश राणा (28) आणि मुलाची आई रिंकी दास (23) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपी मूळचे ओडिशाचे राहणारे आहेत. गेल्या चार महिन्यांपूर्वी रिंकी दास पहिल्या पतिला सोडून आपल्या मुलासह मुंबईत आली होती. मजूर म्हणून काम करणारा आरोपी राजेश राणा आणि रिंकी दास हे जोगेश्वरी परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी राहत होते.  

हे वाचलं का?

हेही वाचा : डॉक्टरला 3 लाखांची लाच देणाऱ्याला अटक; पुणे पोलिसांची कारवाई

लिव्ह-इन मध्ये राहाणाऱ्या या प्रेमी युगलांना 15 महिन्याच्या त्या बाळाची अडचण होत होती. त्यामुळे त्यांनी मिळून बाळाचा काटा काढण्याचा प्लॅन केला. बाळाला दोन्ही आरोपींनी इतकं बेदम मारहाण केली की या सर्वात त्याचा मृत्यू झाला.

चिमुकल्याच्या हत्येचं गुपित कसं झालं उघड? 

21 मे रोजी मुलाचे अपहरण झाल्याची माहिती या प्रेमी युगलाने पोलिसांना दिली. त्यानंतर संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी जेव्हा त्यांची कसून चौकशी केली त्यावेळी ते बोलताना कचरले. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली आणि तपासाअंती हत्येचं बिंग फुटलं. या प्रेमी युगलाने त्या 15 महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण करून मृतदेह मुंबईतील आरे मिल्क कॉलनीजवळील नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर  आता पुढील कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT