Pune Crime News : 12 वर्षाच्या मुलाला खायला लावली कबुतराची विष्टा

ADVERTISEMENT

A boy was caught and taken to a flat where he was fed pigeon droppings.
A boy was caught and taken to a flat where he was fed pigeon droppings.
social share
google news

Pune Crime News In Marathi : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. कधी कोयता गँगची दहशत, तर कधी एमपीएससी विद्यार्थ्याकडून हत्या, हल्ला… कधी बलात्कार… अशा घटनांनी पुणे सतत चर्चेत राहू लागलं आहे. त्यातच आता आणखी एक घटना घडली असून, चार जणांनी 12 वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा प्रकार घडला आहे. (Pune Crime News In Marathi)

पुण्यात ही घटना घडलीये ती कबुतर घेण्याच्या वादातून. चार जणांनी एका 12 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला कात्रजमधील एका मंदिराच्या मागे नेले आणि कबुतराची विष्टा खायला भाग पाडले. या प्रकरणात तक्रार गेली आणि ही घटना समोर आली.

12 वर्षाच्या मुलासोबत काय घडलं?

पुणे शहरातील कात्रजमधील संतोषनगर येथील एका 36 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस (25 जुलै) मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी काय दिली माहिती?

घडलेली घटना अशी आहे की, आरोपींनी कबुतर घेतले होते. त्यावरून वाद झाला. त्यामुळे चार जण लोखंडी हत्यारासह संतोषनगरमध्ये गेले. त्यांनी हवेत हत्यारं फिरवली आणि जर कुणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकू, असे म्हणत दहशत निर्माण केली.

वाचा >> Mumbai: शूटिंग सुरू असतानाच ‘या’ सेटवर घुसला बिबट्या, मराठी कलाकारांची तंतरली!

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व्यक्तीच्या 12 वर्षाच्या मुलाला पकडलं आणि मारहाण केली. त्याचबरोबर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी मुलाला गाडीवर बसवून घेऊन गेले. त्यांनी मुलाला कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले.

ADVERTISEMENT

अपार्टमेंटवर नेल्यावर आरोपींनी मुलाला कबुतराची विष्टा खायला भाग पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना जर आमचे घर दाखवले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याला दिली. त्यानंतर त्याला साई मंदिराजवळ आणून सोडून दिले.

ADVERTISEMENT

वाचा >> ‘मार्शल बोलवून बाहेर काढावं लागेल’, गोपीचंद पडळकरांना नीलम गोऱ्हेंनी झापलं

मुलाने घरी आल्यानंतर झालेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे या करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT