Mumbai:चिकन थाळीत शिजलेला उंदीर,वांद्रेच्या ढाब्यातील धक्कादायक प्रकार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rat meat found in chicken curry customer case file against dhaba manager and chefe mumbai shocking story
rat meat found in chicken curry customer case file against dhaba manager and chefe mumbai shocking story
social share
google news

Rat found in chicken Curry Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एका प्रसिद्ध ढाब्यात ग्राहकाने मागवलेल्या जेवणात उंदीर (Rat) आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या ग्राहकाने ढाबा मालकाला जाब विचारला असता, त्याने चुक मान्य न करता, टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने आता ढाबा मालक आणि आचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसी कलम 272, 336 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु केला आहे. (rat meat found in chicken curry customer case file against dhaba manager and chefe mumbai shocking story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुराग सिंह आपल्या मित्रासोबत वांद्रे पश्चिमेतील पाली परिसरातील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. यावेळी अनुराग यांनी चपातीसोबत चिकन आणि मटण थाळी ऑर्डर केली होती. जेवण टेबलावर आल्यानंतर अनुराग आणि त्याच्या मित्रांनी जेवायला सुरुवात केली होती. जेवताना त्यांच्या थाळीत एक असा मांसाचा तुकडा मिळाला, जो खूपच वेगळा दिसत होता. ज्यावेळी त्यांनी या मांसाच्या या तुकड्याला निरखून पाहिले तेव्हा त्यांना हा तुकडा उंदराचं मांस वाटलं. त्यामुळे अनुराग या घटनेने संतप्त झाले आणि त्यांनी ढाबा मालकाला जाब विचारला होता.

हे ही वाचा : Crime: प्रेमविवाह करून घरी आणलेल्या सुनेने उद्योजक सासऱ्याला संपवलं?, हादरवून टाकणारी कहाणी

अनुराग यांनी संबंधित प्रकार ढाबा मालकाला दाखवताच त्यांनी या घटनेला नकार दिला. त्याचसोबत अनुराग यांनी केलेल्या आरोपात टाळाटाळ करायला सुरूवात केली होती. एकंदरीत आमच्या जेवणात असे मांस आढळणार नाही, असे ढाबा मालकाचे म्हणणे होते. ढाबा मालक आपली चुकी मान्य न करत असल्याचे पाहून अनुराग आणखीणच आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय़ घेतला होता.

हे वाचलं का?

ढाब्यातील या घटनेला संतापून अनुराग यांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी अनुराग यांनी पोलिसांना ढाब्यावर घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनी अनुराग यांच्या तक्रारीवरून तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 272, 336 आणि 34 अंतर्गत तक्रार दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : Crime: गुप्त फोन, प्रियकर अन्… जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT