किळसवाणं! डोसा खाताना निघाले किडे, थेट हाणामारी अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttar pradesh Crime case worm found dosa ruckus restaurant after scuffle police food department varanasi
uttar pradesh Crime case worm found dosa ruckus restaurant after scuffle police food department varanasi
social share
google news

UP Crime : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील (Uttar Pradesh Varanasi) एक कुटुंब एका हॉटेलमध्ये डोसा खाण्यासाठी गेले होते. त्यांनी ज्यावेळी डोसा खाण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना डोसा आणूनही दिला. मात्र ज्यावेळी त्यांच्यासमोर डोसा (Dosa) देण्यात आला. त्यावेळी डोसा खाताना त्यामध्ये त्यांना किडे नजरेस पडले. डोसा खाताना किडे आढळल्याचे त्यांनी मालकाला सांगितल्यानंतर हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांसह मालकानेही गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात (Police) गेल्यानंतर अन्न विभागाकडेही त्याची तक्रार करण्यात आली.

ADVERTISEMENT

म्हणून केला डोसा ऑर्डर

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण वाराणसीमधील दशाश्वमेध परिसरात घडले आहे. या प्रकारामुळे हॉटेलमधील परिसरात मोठा गोंधळ झाला होता. हॉटेलमध्ये आलेल्या कुटुंबीयांना डोसा खायचा होता, म्हणून त्यांनी डोसा ऑर्डर केला होता. मात्र त्यानंतर हॉटेलसह त्या परिसरात जोरदार गोंधळ झाला.
ज्यावेळी डोसा ऑर्डर देण्यात आली, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी ताटातून डोसा आणूनही दिला मात्र त्यानंतर त्यामध्ये त्यांना किडे असल्याचे दिसले.

हे ही वाचा>> Telangana Election Results 2023 Live : तेलंगणात काँग्रेसची बीआरएसवर मोठी आघाडी, कोणाली किती जागा मिळाल्या?

तक्रार करताच मारहाण

त्यामध्ये किडे असल्याची तक्रारही करण्यात आली. त्यामुळे कुटुंब आणि हॉटेल प्रशासनामध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद इतका टोकाला गेला की, कुटुंबातील काही सदस्यांना मारहाणही करण्यात आली. हॉटेलमधील पदार्थाची तक्रार केल्याने मारहाण झाल्याने हे प्रकरण थेट पोलिसात गेले. त्यानंतर त्या कुटुंबाने डोसा खाताना किडे आढळल्याची तक्रार त्यांनी अन्न विभागाकडे केली.

हे वाचलं का?

पोलिसांची मध्यस्थी

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिठवण्याचाही प्रयत्न झाला मात्र या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर वाराणसी महिला व्यापार मंडळाच्या अध्यक्षांनी या प्रकरणी अन्न विभागाकडे तक्रार केली असून अन्न पदार्थ किडे आढळलेच कसे असा सवाल त्यांनी केला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हे ही वाचा>> MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT