Lok Sabha Election 2024 : जयंत पाटील शरद पवारांना सोडणार?
jayant Patil News : लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. या निकालाआधी अनेक राजकीय पक्षाकडून मोठे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यानुसार अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी 4 जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करतीय असा मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
jayant Patil leave Sharad Pawar NCP Party? : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी संपुष्टात येणार आहे. यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे लागले आहे.तत्पुर्वी राजकीय वर्तुळात लोकसभेच्या निकालाबाबत (Lok Sabha Result) अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महाराष्ट्रात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुर आहे. त्यात आता जयंत पाटील (jayant Patil) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडणार असल्याची चर्चा सूरू आहे. त्यामुळे नेमका हा दावा कोणी केला आहे? हे जाणून घेऊयात. (ajit pawar ncp suraj chavan statement jayant patil join congress pravin darekar nana patole lok sabha election 2024 exit poll 2024)
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. या निकालाआधी अनेक राजकीय पक्षाकडून मोठे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यानुसार अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी 4 जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करतीय असा मोठा दावा केला आहे. यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा वेळ देखील मागितला गेला आहे आणि पक्षप्रवेशाचा मुहूर्तही देखील ठरला असल्याचे सूरज चव्हाण यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर शरद पवारांचा राष्ट्रवादी गट ही रिकामा होईल आणि अनेक नेते अजित पवारांच्या नेतृत्वात प्रवेश करतील, असा दावा करून सुरज चव्हाण यांनी खळबळ उडवून दिली आहे.
हे ही वाचा : 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?
सूरज चव्हाणांच्या या दाव्यावर बोलताना भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले की, जयंत पाटील याआधीच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं. यामागचं कारण म्हणजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भविष्य त्यांना माहिती होतं,असे दरेकर म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सूरज चव्हाणांच्या या विधानावर भाष्य केले आहे. 4 जूननंतर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट राहिलं की नाही राहिलं, हा महत्वाचा प्रश्न आहे. पण देशभरातील काँग्रेस विचाराचे जे लोक आहेत ते आता काँग्रेसकडे यायला लागले आहेत. देशात आता परिवर्तनाची लाट तयार झाली आहे. त्यामुळे हायकंमाड यावर जो निर्णय घेतील, त्या निर्णयाचे आम्ही समर्थन करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Exit Poll 2024: 2019 च्या लोकसभेचे एक्झिट पोल किती ठरले होते खरे?
दरम्यान आता खरंच जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? की अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट निकालानंतर दिसणार नाही? हे आता 4 जूननंतर येणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT