Govt Job: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती! कोणाला करता येणार अर्ज?
Job Vacancy 2024: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.
Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती होत आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 12 जागा, परिचारीका (महिला) या पदासाठी 11 जागा, परिचारीका (पुरूष) या पदासाठी 01 जागा, बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी 12 जागा अशा एकूण 36 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. (Govt Job 2024 recruitment in Thane municipal corporation Apply now last date till 7 september 2024 )
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1: MBBS/BAMS
- पद क्र.2: B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.3: B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.4: 1) 12वी (Science) उत्तीर्ण 2) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pune Crime : गळा घोटला, मृतदेहाचे तुकडे तुकडे केले अन्..., लाडक्या भावानेच का केली बहिणीची क्रूर हत्या?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र. 1- 18 ते 70 वर्ष
- पद क्र. 2 ते 4- 18 ते 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.









