Nana Patole :"जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम...", नाना पटोलेंनी सांगितली A to Z स्टोरी

नरेश शेंडे

ADVERTISEMENT

Nana Patole On Badlapur Crime
Nana Patole On Badlapur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाना पटोलेंनी निवडणूक आयोगावर केले आरोप

point

'76 लाख मतांची वाढ कशी झाली?'

point

नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल

Nana Patole Press Conference: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीक करण्यात आला. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विरोधी पक्षांनी इव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसच निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम केलं नाही, असाही आरोप केला जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पटोले म्हणाले, "संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे, त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कोणत्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? हे गंभीर आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झालं आहे. त्यामुळे या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे.जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचा काम निवडणूक आयोगच करतंय. हे या सर्व मुद्द्यातून सिद्ध होतंय. 

ADVERTISEMENT

पत्रकार परिषदेत नाना पटोले पुढे म्हणाले, आमची मिटिंग सुरु आहे. पडलेल्या उमेदवारांचीही मिटिंग चालू आहे. आम्ही हे विषय कोर्टात पाठवू. ही सर्व आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा संशय व्यक्त होतोय. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही. मतदानाचा हा फरक जाणवतोय आणि एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलं आहे, त्यात जवळपास 76 लाख मतांची वाढ झाली आहे. मग ही वाढ झाली कशी? तुम्ही आम्हाला जे सांगताय की, रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं. त्या लाईन कमीत कमी दोन-तीन किलोमीटरच्या असतील. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. त्याची फोटोग्राफी, व्हिडीओ हे सगळं निवडणूक आयोग करतं.

हे ही वाचा >> 28 November Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा कडाडले! मुंबईसह 'या' शहरांमधील गोल्ड रेट वाचून डोकंच धराल

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान 58.22 टक्के होत असेल, मग असं काय होतं की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तुमचं मतदान झालं. त्याच्यामध्ये तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण जवळपास साडे सात टक्क्यांनी वाढलं. याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या या मतदानासंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांकडून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच मिस्टर त्यांनीही यावर ऑब्जेक्शन घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना मविआच्या बाहेर पडणार? राऊत-दानवेंची वेगवेगळी मतं? काय म्हणाले ऐका!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT