Satej Patil : हुंदका आवरला पण बांध फुटला... सतेज पाटील का रडले? अर्ज मागे घेताना काय घडलं? स्वत: सांगितली इनसाईड स्टोरी

मुंबई तक

Madhurima Raje Chhatrapati:मधुरिमा राजे यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सतेज पाटील यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सतेज पाटील रागात जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा ट्विस्ट

point

सतेज पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी

point

सतेज पाटील यांचं पुढचं पाऊल काय?

 Kolhapur : कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला. राजेश लाटकर यांची उमेदवारी अवघ्या काही तासांत बदलून काँग्रेसने ज्या मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती, त्या मधुरिमा राजे यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सतेज पाटील यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दम नव्हता तर उमेदवारी का दाखल केली होती असा संतप्त सवाल करत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी आपल्या समर्थकांसह संवाध साधण्यासाठी सतेज पाटील पुन्हा सर्वांसमोर आले. यावेळी सतेज पाटलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोष्टींबद्दलची इनसाईड स्टोरी सांगितली.

कोल्हापुरातील काही काँग्रेस नगरसेवकांच्या आग्रहास्तव मधुरिमा राजे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी आधीच तिकीट मिळालेल्या राजेश लाटकर यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान सतेज पाटलांसमोर होतं. मात्र अगदी काही तासात राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली. या गोष्टीची राज्यभर चर्चा झाली. काल 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यादिवशी दुपारी मधुरिमाराजे आणि मालोजीराजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल  झाले आणि एकच गोंधळ उडाला. यावेळी तिथे आलेल्या सतेज पाटील यांनी आक्रमक होत आपल्या भावनांचा बांध मोकळा करून दिला होता. 

सतेज पाटील रडले, त्यावेळी त्यांनी सांगितलेला शब्द अन् शब्द.... 

हे ही वाचा >>Mahim Vidhansabha: राज ठाकरेंच्या घरी काय घडलं, सदा सरवणकरांनी सगळंच सांगून टाकलं?

 

माईक हातात घेताच सतेज पाटील भावूक झाले आणि त्यांना रडू कोसळलं. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून सतेज पाटील तुम आगे बडो अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा बोलायला लागले.

दुपारपासून माझी कुणाशी भेट झाली नव्हती. (जिल्हाधिकारी कार्यालयातील गोंधळानंतर) हे सगळं घडल्यावर भुदरगड तालुक्यामध्ये राहुल देसाईंचा प्रवेश होता, गेले ५-६ महिन्यांपासून मी प्रवेशासाठी आग्रह करत होतो. त्यांनी हजारो लोकांचा मेळावा बोलवला होता, मी न जाऊन त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणं योग्य नव्हतं, त्यामुळे मी तिकडे गेलो. म्हणून मी घटना घडल्यावर तिकडे गेलो असं म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापुरात परत येईपर्यंतचा घटनाक्रम सांगितला. 

जे घडलं त्याला सामोरं जायचं सामर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी विनंती. माझ्या आयुष्यात अनेक संकटं आलेत, पद-पैसा-प्रतिष्ठा यापेक्षी तुमच्यापेक्षा जिवाभावाची माणसं हीच माझी संपत्ती आहे. मला दोन वाजून 36 मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, मी माघार घेणार आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असा निर्णय घेऊ नका. काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवून पाच तासात उमेदवारी बदलून दिली होती. मी त्यांना म्हणालो की, काहीही झालं तर जबाबदार मी असेल, तुम्ही काहीही काळजी करू नका. या फोननंतर मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आणि तिथे जे घडलं ते सर्वांसमोर आहे. तिथे त्यांचा हात धरून त्यांना थांबवलं मला संयुक्तिक वाटलं नाही असं सतेज पाटील म्हणाले.

माझ्याकडे या गोष्टींचं उत्तर नाही, माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन  सांगतो की मला काही माहिती नव्हतं, असं सतेज पाटील म्हणाले. त्यांनी निर्णय घेतला त्यावर बोलून फायदा नाही. तुम्ही म्हणाले तर मी परिस्थितीला सामारं जाऊ. राज्यातून देशातून सर्वांचेच मला फोन येतायत. जे घडलेलं आहे ते तुमच्यासमोर सांगितलं असं म्हणत सतेज पाटील यांनी आपल्या भावनांचा बांध मोकळा केला. 


 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp