Viral Video : टिपेश्वर अभयारण्यात जिप्सींनी अडवला वाघाचा रस्ता

मुंबई तक

यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठीचे नियम पायदळी तुडवताना दिसलं. काही अतिउत्साही पर्यटक अभयारण्यातले जिप्सी चालक आणि गाईड यांच्याशी हातमिळवणी करून प्रतिबंधित भागात शिरले. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओनंतर वन विभागात एकच खळबळ उडालीय. गेल्या २८ जानेवारीला काही पर्यटक 3 वेगवेगळ्या जिप्सींनी टिपेश्वर अभयारण्यात गेले. प्रत्यक्षात दोन गाड्यांमध्ये किमान 50 मीटर अंतर ठेवण्याचा नियम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठीचे नियम पायदळी तुडवताना दिसलं. काही अतिउत्साही पर्यटक अभयारण्यातले जिप्सी चालक आणि गाईड यांच्याशी हातमिळवणी करून प्रतिबंधित भागात शिरले. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओनंतर वन विभागात एकच खळबळ उडालीय.

गेल्या २८ जानेवारीला काही पर्यटक 3 वेगवेगळ्या जिप्सींनी टिपेश्वर अभयारण्यात गेले. प्रत्यक्षात दोन गाड्यांमध्ये किमान 50 मीटर अंतर ठेवण्याचा नियम आहे. मात्र या जिप्सी चालकांनी नियमाला बगल दिली. आणि वाहनं अगदी जवळ जवळ उभी केली. समोरून आलेल्या वाघाचा रस्ता अडवून धरला.

एवढंच नाही तर निर्धारित रस्ता सोडून आपलं वाहन इतर रस्त्याने जंगलात नेलं. आणि त्याठिकाणीसुद्धा वाघाला पाहून आपलं वाहन त्याच ठिकाणी उभं करून ठेवलं. तीन जिप्सी चालकांचा हा प्रताप मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून आता तो व्हीडिओसुद्धा व्हायरल झाला. त्यामुळे आता वन विभागात चांगलीच खळबळ उडाली.

अभयारण्यात पर्यटनासाठी जाताना वन विभागाने काही नियम घालून दिलेत. पर्यटक तसंच जिप्सी चालक, गाईड यांनी या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. मात्र अशा मनमानी पद्धतीने वागणं पर्यटकांच्या जीवावर बेतू शकतं.

दरम्यान, या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जागं झालेल्या वन विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. जिप्सी चालक, गाईड आणि पर्यटक यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp