चीनमध्ये मोठी दुर्घटना! १३३ प्रवाशांना घेऊन जाणार बोईंग 737 विमान कोसळलं

China Plane Crash, Eastern Airlines plane boeing 737 : दुर्घटनाग्रस्त विमान चायना ईस्टर्न एअरलाईन्सचं
चीनमध्ये मोठी दुर्घटना! १३३ प्रवाशांना घेऊन जाणार बोईंग 737 विमान कोसळलं
(Image for representation: Reuters)

चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान डोंगराळ भागात कोसळलं आहे. या विमानातून १३३ जण प्रवास करत होते. बोईंग ७३७ हे प्रवासी विमान कोसळ्याच्या वृत्ताला चीनच्या हवाई उड्डाण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. विमानात १२३ प्रवासी, तर ९ कर्मचारी होते.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे प्रवासी विमान कुलमिंग येथून गौंगझाऊकडे झेपावले होते. गौंगझाऊकडे जात असतानाच विमान गौंगझीच्या परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले. विमान पर्वतीय भागात कोसळलं असून, दुर्घटनेनंतर अपघाताच्या ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार MU5735 हे विमान चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील युन्नान प्रांतातील कुनमिंग शहरातील शांगशुई विमानतळावरून चीनमधील प्रमाणवेळेनुसार १.१५ वाजता आकाशात झेपावलं होतं. तीन वाजेपर्यंत हे विमान गौंगडोई प्रांतातील गौंगझाई येथे पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र, त्यापूर्वीच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

वृत्तसंस्था झिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव दलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. जे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे, ते साडेसहा वर्षांपूर्वीच सेवेत दाखल झालेलं होतं. जून २०१५ मध्ये चायना ईस्टर्न एअरलाईन्सने हे विमान खरेदी केलं होतं. MU5735 विमानात १६२ आसन असून, यात १२ बिझनेस क्लास आणि १५० इकोनॉमी क्लासमधील होती.

विमान कोसळल्यानंतर TheLegateIN या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. एका डोंगराळ भाग दिसत असून, एका ठिकाणाहून आग लागल्यानंतर धुराचे लोळ दिसत आहेत. हे विमान दुर्घटनेनंतरचे दृश्य असल्याचा दावा केला जात आहे.

एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कच्या माहितीप्रमाणे चीनमध्ये शेवटची विमान दुर्घटना २०१० मध्ये घडली होती. Embraer E-190 हे विमान कोसळलं होतं. या विमानात ९६ प्रवासी होते. त्यापैकी ४४ प्रवाशी मरण पावले होते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in