नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या जास्त संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांना प्रत्युत्तर
नीरज गुंडेला मी ओळखतो, माझे आणि त्याचे संबंध नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. मात्र उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत. एवढंच नाही तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील असंही फडणवीस म्हणाले आहेत. ‘मला उद्धव ठाकरेंशी चर्चा […]
ADVERTISEMENT

नीरज गुंडेला मी ओळखतो, माझे आणि त्याचे संबंध नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. मात्र उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत. एवढंच नाही तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील असंही फडणवीस म्हणाले आहेत.
‘मला उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी कोणाच्याही मांडवलीची गरज लागत नाही. उद्धव ठाकरे आणि मी मांडवली नव्हे तर चर्चा करायचो. नवाब मलिक यांच्यासारखे लोक मांडवली करतात, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी केलेल्या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक आपण काहीतरी मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणत आहेत. नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय. पण मी दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब फोडणार. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणारे संबंध मी पुराव्यानिशी समोर आणेन. देवेंद्र फडणवीस हा पुराव्याशिवाय आरोप करत नाही. आजपर्यंत एकदा केलेला आरोप मला कधीही मागे घेण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नवाब मलिकांनी सुरु केलेल्या या खेळाचा शेवट आता मी करणार. मी काचेच्या घरात राहत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.