जळगाव: शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली, खडसेंकडून जीवाला धोका; शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

मुंबई तक

मनीष जोग, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुक्ताईनगरात काल (25 डिसेंबर) रात्री वाद होऊन परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर रोहिणी खडसे माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की, महिलांवर जर अशाच पध्दतीने अन्याय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनीष जोग, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुक्ताईनगरात काल (25 डिसेंबर) रात्री वाद होऊन परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर रोहिणी खडसे माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की, महिलांवर जर अशाच पध्दतीने अन्याय होत राहिला तर वेळप्रसंगी आमदाराला चोप देऊ अशी प्रतिक्रिया दिली.

यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे परिवाराकडून यापूर्वीही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे तसेच हल्ले झाल्याचा प्रकार घडला आहे. आता रोहिणी खडसेंनी थेट चोप देण्याची भाषा केल्याने माझ्या जीवाला धोका असून याबाबत पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली होती. आता महाविकास आघाडी तुटू नये. असं वक्तव्यही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp