बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर, आरोपी शोधल्यानंतर चक्रावले पोलीस

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर, आरोपी शोधल्यानंतर चक्रावले पोलीस

मुंबईत राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरूणीने आपल्या नावाने इंस्टाग्रामला अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. त्याद्वारे न्यूड फोटो शेअर केले जात आहेत अशी तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना जे समजलं त्यामुळे तेदेखील चक्रावून गेले आहेत. तरूणीच्या तक्रारीनंतर सगळ्यात आधी तर पोलिसांनी इंस्टाग्रामशी संपर्क साधला आणि ते खातं डिलिट करायला लावलं. मात्र हे फोटो कुणी अपलोड केलेत हे पोलिसांना समजलं नव्हतं. आता पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला आहे. या प्रकरणातील आरोपी एक 16 वर्षांची मुलगी आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून ऑक्टोबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. आपल्या नावे इंस्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं असून न्यूड फोटो शेअर करण्यात आल्याची तक्रार या तरूणीने दिली होती. आपले न्यूड फोटो शेअर होत आहेत हे कळल्यावर या तरूणीने तक्रार केली होती. या तरूणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यावेळी काढण्यात आलेले फोटो शेअर होत होते. मात्र काही वर्षांपासून हे दोघे वेगळे झाले होते. त्यामुळे या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडनेच हे केलं असावं असा संशय पोलिसांना होता.

यानंतर सायबर पोलिसांनी ज्या फोन क्रमांकावरून हे अकाऊंट तयार करण्यात आलं होतं त्याचा छडा लावला. फोटो अपलोड करण्यासाठी ज्या फोनचा वापर करण्यात आला, तो फोटो प्रियकराच्या वडिलांचा होता. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलं आहे. ही मुलगी 16 वर्षांची आहे. ज्या मुलीने न्यूड फोटो शेअर होत आहेत अशी तक्रार केली होती त्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड आणि या 16 वर्षांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. तिघेही एकाच परिसरात राहणारे आहेत. त्यामुळे या 16 वर्षांच्या मुलीला बॉयफ्रेंडची एक्स गर्लफ्रेंड कोण हे माहित होतं. त्यामुळे तिनेच प्रियकराच्या वडिलांचा मोबाईल वापरून इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले.

मुंबई क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी आपल्यास प्रियकराच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करणाऱ्या 16 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आहे. या मुलीने मत्सरापोटी हे फोटो शेअर केल्याचं सांगितलं आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला अटक कऱण्यात आलेली नाही. मात्र तिने केलेलं कृत्य गंभीर असल्याने तिला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तिला कोर्टातही हजर केलं जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in