Omicron : महाराष्ट्राच्या चिंतेत भर! एकाच दिवसात आढळले 'ओमिक्रॉन'चे 23 रूग्ण

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती आहे ओमिक्रॉन रुग्णांची संख्या?
Omicron : महाराष्ट्राच्या चिंतेत भर! एकाच दिवसात आढळले 'ओमिक्रॉन'चे 23 रूग्ण
(फोटो सौजन्य: Reuters)

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 23 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंट असलेल्या महाराष्ट्रातल्या एकूण रूग्णांची संख्या 88 झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. 23 पैकी 22 रूग्णांचा अहवाल राष्ट्रीय विज्ञान संस्थेने तर एक रूग्णाचा अहवाल राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने दिला आहे.

ओमिक्रॉनचे कुठे किती रूग्ण?

मुंबई -33

पिंपरी-19

पुणे ग्रामीण-10

पुणे मनपा-6

उस्मानाबाद-5

सातारा-3

कल्याण-डोंबिवली-2

बुलढाणा-1

नागपूर-1

लातूर-1

वसई विरार-1

नवी मुंबई-1

ठाणे-1

मीरा भाईंदर-1

एकूण-88

यापैकी 42 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी गेले आहेत. गुरूवारी (23 डिसेंबर) आढळून आलेल्या 23 रूग्णांपैकी 16 जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतले आहेत, तर 7 जणांना त्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला आहे.

Omicron : महाराष्ट्राच्या चिंतेत भर! एकाच दिवसात आढळले 'ओमिक्रॉन'चे 23 रूग्ण
राज्यात कडक निर्बंध लागणार; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सशी झाली चर्चा, आज येणार नियमावली

प्रवासाचा इतिहास असा आहे-

मध्यपूर्व देश-6

युरोप-4

घाना आणि द. अफ्रिका येथून प्रत्येकी 2

सिंगापूर आणि टांझानिया प्रत्येकी 1

यातील चार रूग्ण हे 18 वर्षांखालील बालकं आहेत तर दोन जणांचं वय 60 वर्षांवरील आहे.

यापैकी 17 जणांना लक्षणं नाहीत. तर सहा जणांना सौम्य लक्षणं आहेत. या पैकी 18 रूग्णांचं लसीकरण झाले आहे, एका रूग्णाचे लसीकरण झाले नाही. तर चार रूग्ण लसीकरणाची पात्र नाहीत.

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 670 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 124 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे

राष्ट्रीय कोव्हिड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, 'पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तथापि, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी कमकुवत असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.'

'एप्रिल-मेमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत त्याची संख्या कमी असेल. सरकारने 1 मार्चपासून भारतात लसीकरण सुरू केले होते. डेल्टा व्हेरिएंट देखील याच वेळेस भारतात आला होता. त्यावेळी फ्रंटलाईन वर्कर्स वगळता कोणालाही लस देण्यात आली नव्हती. त्यामुळेच डेल्टाने मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित केलं होतं.'

विद्यासागर म्हणाले, 'आता देशात 75 ते 80 टक्के सीरो-प्रेवलेन्स आहे. 85% लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 55% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जे या साथरोगापासून 95% संरक्षण करते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तेवढ्या प्रमाणात रुग्ण समोर येणार नाहीत जेवढे दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाले होते. तसेच दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आपण आपली क्षमताही निर्माण केली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा सामना करू शकतो.'

'दररोज 2 लाख नवे रुग्ण सापडू शकतात'

हैदराबादमधील आयआयटीचे प्राध्यापक विद्यासागर म्हणाले की, 'रुग्णांची संख्या ही दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली गोष्ट म्हणजे डेल्टामधून मिळालेली नैसर्गिक प्रतिकारशक्तीला ओमिक्रॉन किती बायपास करते आणि दुसरी गोष्ट लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीला ओमिक्रॉन चकमा देऊ शकतो. या दोन गोष्टींवर तिसरी लाट अवलंबून असणार आहे.'

'सध्या या दोनही गोष्टींबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, जर देशात तिसरी लाट आली तर सर्वात वाईट परिस्थितीत भारतात दररोज दोन लाखांपेक्षा जास्त केसेस नसतील. तथापि, प्राध्यापकांनी हा केवळ अंदाज आहे, भविष्यवाणी नाही' असंही स्पष्टपणे सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in