Vidhan Parishad : सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी? सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार?
एकीकडे राज्यसभेच्या मतदानाची जोरदार तयारी सुरू असताना विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाल्याचं समोर येतं आहे. पहिल नाव आहे ते म्हणजे सचिन अहिर यांचं तर दुसरं नाव आहे आमशा पडाडवी यांच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन नावांना संधी मिळू शकते. असं झालं तर सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार असंही बोललं […]
ADVERTISEMENT

एकीकडे राज्यसभेच्या मतदानाची जोरदार तयारी सुरू असताना विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाल्याचं समोर येतं आहे. पहिल नाव आहे ते म्हणजे सचिन अहिर यांचं तर दुसरं नाव आहे आमशा पडाडवी यांच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन नावांना संधी मिळू शकते. असं झालं तर सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार असंही बोललं जातं आहे.
विधानपरिषदेची निवडणूक जवळ आलेली असताना सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी दिल्याचं निश्चित मानलं जातं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सचिन आहिर शिवसेनेत आले. आदित्य ठाकरे यांना निवडून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. ज्यानंतर आदित्य ठाकरे निवडूनही आले. सचिन आहिर यांचं पुनर्वसन करणं बाकी होतं ते या निमित्ताने केलं जातं आहे असं बोललं जातं आहे.
शिवसेना: ‘सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं मला वाईट वाटलं’, रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद
आमशा पाडवी कोण आहेत?