Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी ४४ हजार ३८८ रुग्णांची नोंद, १२ रुग्णांचा मृत्यू
संपूर्ण देशासह राज्यभरात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. राज्यात आज तब्बस ४४ हजार ३८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत आजच्या दिवसात २०७ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं असून आतापर्यंत ओमिक्रॉन बाधितांची संख्या १२१६ पर्यंत पोहचली असून, ४५४ जणांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. २४ तासांत […]
ADVERTISEMENT
संपूर्ण देशासह राज्यभरात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. राज्यात आज तब्बस ४४ हजार ३८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत आजच्या दिवसात २०७ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं असून आतापर्यंत ओमिक्रॉन बाधितांची संख्या १२१६ पर्यंत पोहचली असून, ४५४ जणांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.
ADVERTISEMENT
२४ तासांत १५ हजार ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरीही गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. आज रुगणसंख्येने ४० हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.
…तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील – राजेश टोपेंचा तळीरामांना इशारा
हे वाचलं का?
गेल्या काही दिवसांमधली राज्यामधली रुग्णसंख्या –
-
८ जानेवारी – ४१, १३४ रूग्ण
ADVERTISEMENT
७ जानेवारी – ४०, ९२५ रूग्ण
ADVERTISEMENT
६ जानेवारी – ३६,२६५ रूग्ण
५ जानेवारी – २६, ५३८ रूग्ण
४ जानेवारी – १८, ४६६ रूग्ण
३ जानेवारी – १२, १६० रूग्ण
२ जानेवारी – ११, ८७७ रूग्ण
१ जानेवारी – ९,१७० रूग्ण
एककीडे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना, राज्याचा मृत्यूदरही चिंतेत टाकणारा आहे. राज्यात आज १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्याच्या घडीला राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या! कालच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी परंतू ७ रुग्णांच्या मृत्यूने चिंता कायम
राज्यात सध्या २ लाख २ हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ७२ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के आहे. सध्या राज्यात १० लाख ७६ हजार ९९६ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT