शिवस्मारकासाठी समुद्रातून भुयारी मार्गाची तपासणी: अशोक चव्हाण
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रस्तावित स्मारकापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बारमाही समुद्रातून जाणं शक्य नसल्याने वर्षातून बारमाही शिवस्मारकापर्यंत जाता यावे यासाठी भुयारी मार्गाच्या पर्यायाचा शोध सुरु असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. पाहा याविषयी नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण: शिवस्मारकासंबंधीचा […]
ADVERTISEMENT

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रस्तावित स्मारकापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बारमाही समुद्रातून जाणं शक्य नसल्याने वर्षातून बारमाही शिवस्मारकापर्यंत जाता यावे यासाठी भुयारी मार्गाच्या पर्यायाचा शोध सुरु असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
पाहा याविषयी नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण:
शिवस्मारकासंबंधीचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे. पण असं असलं तरीही जेव्हा याविषयी निर्णय येईल त्यानंतर या कामाला गती येईल. अशावेळी जर आपल्याला समुद्रात शिवस्मारक उभारल्यानंतर तिथे बारा महिने जाता येणार नाही. कारण की, साधारण ३ ते ४ महिने हे पावसाचे असल्याने समुद्रात प्रचंड वारा असतो आणि समुद्र देखील खवळलेला असतो. अशावेळी जर आपल्याला त्या चारही महिन्यात शिवस्मारकात जायचं असेल तर त्यासाठी भुयारी मार्ग हा चांगला पर्याय ठरु शकतो. याविषयी प्राथमिक पातळीवर चर्चा झाली आहे.
मात्र असं असलं तरीही याबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण पुढील काही गोष्टी लक्षात घेता असा विचार सध्या सुरु आहे. ज्यामुळे सर्वांना बारमाही शिवस्मारकाजवळ जाता येणार आहे.